facebook
Sunday , April 30 2017
Breaking News
Home / Featured / सायकलची क्रेझ अजूनही कायम

सायकलची क्रेझ अजूनही कायम

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – पुण्यात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची जरी भाऊगर्दी झाली असली तरी, पुणेकरांचे सायकलवरचे प्रेम अद्याप कमी झालेले नाही. शाळेत जाण्यासाठी मुलांकडून आणि तरुणांकडून व्यायामासाठी आजही सायकलचा वापर होत असल्याचे दिसून येते. अशा सायकलप्रेमींना दर्जेदार सायकल पुरवण्यात फडके हौद चौकातील अनेक दुकानांचा मोठा वाटा आहे.
पूर्वी वापरल्या जाणाऱ्या जुन्या सायकलींऐवजी आता अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत आणि दिसायला देखण्या अशा सायकलींना पुणेकरांची पसंती लाभत आहे. त्यांची बदलती आवड लक्षात घेता या परिसरातील सायकलींच्या दुकानांनी देखील कात टाकली आहे. जागतिक स्तरावरील विविध ब्रँडच्या दर्जेदार सायकल मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणून हा परिसर ओळखला जात आहे.
शालेय विद्यार्थी, सायकलीची आवड असणारे नागरिक, व्यायामाची आवड असणार, खेळाडू, आणि सायकलिंग स्पर्धांमध्ये सहभागी होणारे याच परिसरातून सायकली खरेदी करतात. एकाच ठिकाणी परदेशी आणि स्वदेशी कंपन्यांच्या सायकली उपलब्ध होत असल्याने त्यांना आधुनिक तंत्रज्ञान, सायकलचा लूक आणि आवड अशा सर्वच गोष्टी तपासून पाहता येतात.
सध्या या परिसरात असलेल्या दुकानांमध्ये ब्रँडेड सायकल्सना सर्वाधिक मागणी आहे. त्यामध्ये लहान मुलांसाठी १४ इंची (टायरचा व्यास), १६ इंची सायकल्स उपलब्ध आहे. फँटम, फायरफॉक्स, ट्रेक, क्रॉस, रॅले, श्नेल अशा ब्रँडेड कंपन्यांच्या सायकलींना प्रचंड मागणी आहे. कामगार वर्ग वगळता लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वच जण या सायकली वापरतात. याशिवाय या परिसरातील दुकानांमध्ये अॅटलस, हीरो, गोल्डी, बीएसए, लेडी बर्ड अशा कंपन्यांच्या भारतीय बनावटीच्या सायकल्स देखील उपलब्ध आहेत. परंतु, मेटल बॉडी असल्याने आणि साधे ब्रेक असल्याने या कंपन्यांच्या सायकलींना फारशी मागणी नाही. पुणेकरांकडून गीअरयुक्त सायकलला मागणी वाढत आहे.
विदेशी बनावटीच्या सायकली ७ हजारांपासून ते ३ लाख किमतीपर्यंतच्या सायकल्स उपलब्ध करण्यात आल्या आहेत. भारतीय बनावटीच्या सायकल्स २ हजारांपासून ते १५ हजारांपर्यंत उपलब्ध आहेत.

सायकलमध्येही आता नवनवीन तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. सायकल चालवताना तिचा आनंद घेता यावा, त्यांचा दर्जा वाढविण्यात येत आहे. या आधी केवळ २७ इंच व्यासाच्या सायकली बाजारात मिळत होत्या. मात्र, आता २९ इंची व्यासाच्याही सायकली उपलब्ध आहेत. त्यामुळे कमी श्रमातही अधिक वेगाने विशिष्ट अंतर कापणे शक्य झाले आहे. दर काही महिन्यांनी सायकल्सचा ट्रेंड बदलत असून, ब्रँडेड सायकल्सना पुणेकरांची सर्वाधिक पसंती आहे.

प्रमोद भुता‍ळे, सायकल व्यावसायिक, फँटम सायकल्स

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *