facebook
Sunday , December 11 2016
Home / अहमदनगर / उत्तर-मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट
cold

उत्तर-मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट

उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट आली असून बहुतांश ठिकाणचे तापमान दहा अंशापर्यंत झाली आले आहे. सोमवारी नगरमध्ये राज्यातील नीचांकी तापमान ८.० अंश सेल्सिअस नोंदले गेले. यावर्षीच्या हिवाळ्यातील हे सर्वांत कमी तापमान आहे.

पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर मध्य महाराष्ट्रात म्हणजे पुणे, नगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या भागात थंडीची लाट आहे. तापमानात लक्षणीय घट झाल्याचे आढळून आले. नगरमध्ये सरासरीच्या तुलनेत पारा ७ अंश सेल्सिअसने घसरला आहे. त्यामुळे रात्री बोचणारी थंडी जाणवत होती. नाशिकमध्ये ९.०, पुणे ९.६, जळगाव १०.८, मालेगाव ११.२ असे किमान तापमान नोंदले गेले आहे.
नगरमध्ये २००७ मध्ये २२ नोव्हेंबर रोजी ७.० अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते. ते अलीकडच्या काळातील नोव्हेंबरचे नीचांकी तापमान आहे. त्यानंतर नोव्हेंबर २०१२ मध्ये ७.४, २००८ मध्ये ९.३ तर २०११ मध्ये ९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. यावर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या टप्प्यातच थंडी जाणवू लागली होती. १० नोव्हेंबरला पारा ८.१ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला होता. त्यानंतर ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली होती. आता पुन्हा थंडी जाणवू लागली आहे. रब्बीच्या पिकांसाठी थंडी आवश्यक असली तरी यापेक्षा तापमान खाली गेल्यास पिकांसाठी ते नुकसानकारक असल्याचे सांगण्यात येते.

सध्या उत्तरेकडून आणि उत्तरपूर्व दिशेने थंड व कोरडे वारे वाहत आहेत. मध्यप्रदेशातून ते मध्यमहाराष्ट्रापर्यंत पोहचले आहेत. हिमाचल प्रदेशातील थंड व कोरडी हवा घेऊन आलेल्या या वाऱ्यांमुळे आपल्याकडे थंडी पडली आहे. आणखी दोन दिवस पुणे आणि परिसरातील भागात थंडी कायम राहण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.

Check Also

agreement

जमीन, फ्लॅट खरेदी-विक्रीचे व्यवहार थंडावले

पाचशे व हजार रुपयांच्या नोटा व्यवहारातून रद्द केल्यानंतर चलन तुटवड्यामुळे जिल्ह्यातील जमीन, फ्लॅट खरेदी-विक्रीचे व्यवहार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *