facebook
Saturday , December 10 2016
Home / Featured / जीएसटी पोर्टलवर ३०पर्यंत नोंदणी करा : अर्थमंत्री
aawaz-news-image

जीएसटी पोर्टलवर ३०पर्यंत नोंदणी करा : अर्थमंत्री

आवाज न्यूज नेटवर्क –

नागपूर – राज्यातील जे व्यापारी मुंबई विक्रीकर कायदा, केंद्रीय विक्रीकर कायदा, ऐषाराम कर कायदा या खाली नोंदणीकृत आहेत, त्यांना वस्तू आणि सेवा कर कायद्याखाली जीएसटी कॉमन पोर्टलवर ३० नोव्हेंबर २०१६ पर्यंत नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे राज्यातील नोंदणीकृत व्यापाऱ्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

जीएसटी कॉमन पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आवश्यक असे लॉगइन आयडी व पासवर्ड विक्रीकर विभागाला पाठवले असून त्याचे संबंधित व्यापाऱ्यास वाटप करण्यासाठी विभागाने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पहिल्या टप्प्यात ही सुविधा जे व्यापारी ३१ ऑगस्ट २०१५ पूर्वी नोंदीत आहेत तसेच ज्यांचे पॅन व्हॅलिडेशन झाले आहे अशा व्यापाऱ्यांना उपलब्ध असेल. त्यांनाच लॉग इन आयडी आणि पासवर्ड पुरवण्यात येत आहेत.
१ सप्टेंबर २०१५ पासून पुढे नोंदित झालेल्या तसेच पॅन व्हॅलिडेशन न झालेल्या व्यापाऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात लॉग इन आयडी आणि पासवर्ड पुरवण्यात येतील. पहिल्या टप्प्यातील अशा व्यापाऱ्यांची संख्या ७ लाख ६३ हजार ७५१ इतकी आहे. विक्रीकर विभागाने यासाठी ३५ टी २०१६ हे परिपत्रक निर्गमित केले असून त्यात लॉग इन आयडी आणि पासवर्ड वाटप करण्यासंबंधीची संपूर्ण प्रक्रिया नमूद केली आहे. सध्या पात्र असणाऱ्या व्यापाऱ्यांची यादी, युजर मॅन्युअल आणि परिपत्रक विक्रीकर विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Check Also

fadnavis

मराठा आरक्षण देणारच : देवेंद्र फडणवीस

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी ‌विधानसभेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *