facebook
Sunday , December 11 2016
Home / जळगाव / विद्यार्थी-कुलगुरू संवाद फळाला
jalgaon

विद्यार्थी-कुलगुरू संवाद फळाला

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांच्या पहिल्याच कुलगुरू-विद्यार्थी संवाद उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जवळपास ६० विद्यार्थ्यांनी कुलगुरूंची भेट घेऊन विविध प्रकारच्या समस्या मांडल्या. विशेष म्हणजे यातील बहुसंख्य प्रश्न कुलगुरूंनी तत्काळ मार्गी लावले.

कुलगुरूंनी त्यांच्या दालनात प्रश्न घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांसमवेत वैयक्तिक चर्चा केली आणि समस्या जाणून घेतल्या. सामूहिक समस्या न मांडता प्रत्येक विद्यार्थ्याने वैयक्तिक येऊन भेटावे, असे आवाहन कुलगुरुंनी केले होते. संशोधन, शिष्यवृत्ती, आर्थिक मदत, विद्यापीठासाठी बससेवा, विद्यापीठ प्रशाळेतील बंद असलेली उपकरणे, विद्यापीठात बंद असलेले स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करणे, ग्रंथालयाच्या वाचन कक्षाची क्षमता वाढविणे, पीएच.डीचा प्रबंध सादर केल्यानंतर अनेक महिने उलटले, तरी मौखिक परीक्षा न होणे आदींचा तक्रारींमध्ये समावेश होता. कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांनी या समस्या तत्काळ मार्गी लावल्या. या संवाद उपक्रमाद्वारे ज्या विद्यार्थ्यांच्या समस्या मार्गी लागल्या, त्यांनी याबाबत विद्यापीठाकडे अभिप्राय पाठवावे असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.

Check Also

youth-festival

उमविचा युवक महोत्सव रंगणार जानेवारीत

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या युवारंग युवक महोत्सवाचे आयोजन १९ ते २३ जानेवारी या दरम्यान धनाजी नाना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *