facebook
Thursday , April 27 2017
Breaking News
Home / Featured / घरबसल्या होणार ‘आरटीओ’ची कामे

घरबसल्या होणार ‘आरटीओ’ची कामे

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) नवीन वाहन नोंदणी करणे, विविध प्रकारचे कर भरणे, लायसन्स काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करणे, अन्य कोणत्याही प्रकारचे शुल्क भरणे किंवा वाहन नोंदणीचे प्रमाणपत्र मिळविणे (आरसीटीसी) आदींसाठी नागरिकांना आता ‘आरटीओ’मध्ये जाण्याची आवश्यकता नाही. ‘सारथी ४.०’ या प्रणालीद्वारे घरबसल्या किंवा वाहन विक्रेत्याच्या ऑफिसमधून ही कामे ऑनलाइन करता येतील. १५ डिसेंबरपासून या अद्ययावत प्रणालीचा पुणे आरटीओमध्ये वापर करण्यात येणार आहे.

परिवहन विभागाकडून विकसित करण्यात आलेल्या ‘सारथी ४.०’ या वेब बेस्ड प्रणालीद्वारे राज्यातील ‘आरटीओ’ची सर्व कार्यालये जोडण्याची योजना आहे. त्याअंतर्गत राज्यातील कोल्हापूर आणि वाशी आरटीओमध्ये यापूर्वी ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. आता पुणे आरटीओमध्ये ही प्रणाली कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी आरटीओतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात येत आहे. लवकरच वाहन वितरकांनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी दिली. आजरी यांनी नुकताच पुणे आरटीओचा पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी येथील परिस्थितीचा आढावा घेतला.
एखाद्या व्यक्तीने नवीन वाहन खरेदी केल्यास, वाहनाच्या नोंदणीपासून विविध कर भरण्यापर्यंत आणि वाहनाला चॉइस नंबर हवा असल्याची त्याची प्रक्रियाही वितरकाच्या कार्यालयातून करणे शक्य होणार आहे. या प्रणालीमध्ये वितरकांसाठी स्वतंत्र पर्याय देण्यात आला आहे. त्याद्वारे त्यांचे व्यवहार ऑनलाइन होतील, असेही आजरी यांनी सांगितले.

‘ई-वॉलेट’वर भर देण्याची गरज

स्कूलबस चालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम आखली जाणार आहे. शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा मानस आहे. सध्या पाचशे, हजारच्या नोटा बंदीमुळे बाजारात सुट्ट्या पैशांची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे काही रिक्षा चालकांकडून ‘ई-वॉलेट’चा वापर केला जात आहे. रिक्षा चालकांनी या पर्यायाचा भविष्यातही विचार करावा, यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात आहे, असे त्यांनी सांगितले.

आरटीओ कार्यालयांना स्वतंत्र ब्रेक टेस्ट ट्रॅक नसल्याने हायकोर्टाने सर्व आरटीओतील कामकाज बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर टेस्ट ट्रॅक उपलब्ध करून देण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार पुणे आरटीओसाठी दिवे येथील २५ एकर जागेत ब्रेक टेस्टिंग ट्रॅक उभारण्याच्या कामास मंजुरी मिळाली आहे. लवकरच त्या कामाचे टेंडर काढले जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात वाहनांना ब्रेक टेस्टसाठी यापुढे दिवे येथे जावे लागेल. – बाबासाहेब आजरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *