facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / चार दिवसांतउलाढाल दोनशे कोटींवर

चार दिवसांतउलाढाल दोनशे कोटींवर

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर – ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर आयोजित केलेल्या ‘मेक इन कोल्हापूर इंडस्ट्रिया-२०१६’ या उद्योग प्रदर्शनाला उद्योजक, तंत्रज्ञ आणि इंजिनीअर्सकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला. चार दिवसांत प्रदर्शनाला सुमारे वीस हजारहून अधिक उद्योजकांनी भेट दिली. प्रदर्शनात सहभागी झालेल्या स्टॉलधारकांना मिळालेल्या ऑर्डर्समधून सुमारे २०० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज संयोजकांनी व्यक्त केला आहे.

कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज्, स्मॅक, गोशिमा, मॅक, उद्मम को-ऑप. सोसायटी, कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनात एकूण १०० स्टॉल्स उभारले आहेत. यात पॅकेजिंग, सोलर एक्स्पोझर, वेव्हिंग मशिन, स्टोअरेज सिस्टिम, सेफ्टी इक्विपमेंट्स, कटिंग टूल्स, बेअरिंग्ज, अत्याधुनिक चेन्स अॅन्ड पुलिंग, अशी विविध उत्पादने पाहावयास मिळाली.

कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रच नव्हे, तर गुजरातमधील अहमदाबाद, वसई, ठाणे, भाईंदर, नाशिक, औरंगाबाद, पुणे, बेळगाव येथील येथील उद्योजकांनीही प्रदर्शनाला भेट दिली. उद्योजकांबरोबरच इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनीही प्रदर्शनात हजेरी लावली होती. चार दिवसांत सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली. मंगळवारी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशीही प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळाला. मंगळवारी दुपारनंतर प्रदर्शनाला सर्वाधिक गर्दी झाल्याचे दिसत होते. अखेरच्या दिवशी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने, स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन आणि गोशिमाचे अध्यक्ष जे. आर. मोटवाणी यांच्या उपस्थितीत स्टॉलधारकांचा सत्कार करण्यात आला.

कोट…

प्रत्येकाला सतत संशोधनात्मक काहीतरी पाहण्याची इच्छा असते. त्यामुळेच या प्रदर्शनाला लोक मोठ्या प्रमाणावर भेट देतात. स्टॉलधारकांनाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याने त्यांचाही उत्साह दरवर्षी वाढत आहे. या प्रतिसादामुळे पुढील वर्षीच्या नियोजनासाठी जबाबदारी वाढत आहे.

– आनंद माने, अध्यक्ष चेंबर ऑफ कॉमर्स

गेल्या चार दिवसांत सुमारे २० हजारहून अधिक उद्योजकांनी प्रदर्शनाला भेट दिली. इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश मोफत होता. चार दिवसांत स्टॉलधारकांपैकी अनेकांना कोट्यवधी रुपयांच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. त्यामुळे प्रदर्शनाची उलाढाल सुमारे २०० कोटी रुपयांच्या जवळपास गेल्याचा आमचा अंदाज आहे.

– सुजित चव्हाण, संयोजक

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *