facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / जादा नोटा बदलून दिल्याने महाबँकेचा अधिकारी निलंबित

जादा नोटा बदलून दिल्याने महाबँकेचा अधिकारी निलंबित

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद – रिझर्व्ह बँकेने नोट बदलून देण्यासाठी केलेले नियम मोडून एका व्यापाऱ्याला मोठ्या प्रमाणात नोटा बदलून दिल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र बँकेच्या उदगीर शाखेतील अधिकाऱ्यासह अन्य तिघांना निलंबित करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर रोजी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्या. नागरिकांकडे असलेल्या नोटा बदलून देण्याचे काम १० नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आले. नोटा बदलून देण्यासाठी मर्यादा घालून देण्यात आली आहे. उदगीर येथील महाराष्ट्र बँकेतील अधिकारी विकास कदम आणि अन्य तीन कर्मचाऱ्यांनी एका व्यापाऱ्याच्या हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा घेऊन शंभर रुपयांच्या नोटा दिल्याचा संशय आहे. नोटा बदलून देण्याचा नियम मोडून गैरप्रकार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यामुळे अधिकारी कदम व तीन रोखपालांना निलंबित केल्याची माहिती महाराष्ट्र बँकेचे विभागीय व्यवस्थापक महेश बन्सवाणी यांनी दिली.
महाराष्ट्र बँकेच्या अधिकाऱ्यांचे एक पथक उदगीर येथे गेले आहे. ते या गैरप्रकाराची तपासणी करीत आहे, असेही बन्सवाणी यांनी सांगितले. महाराष्ट्र बँकेच्या या शाखेतून व्यापाऱ्याला सुमारे २० लाख रुपयांच्या नोटा बदलून दिल्याची चर्चा आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *