facebook
Thursday , March 2 2017
Breaking News
Home / Featured / टाकळी ढोकेश्वरला राष्ट्रवादीचे रस्ता रोको

टाकळी ढोकेश्वरला राष्ट्रवादीचे रस्ता रोको

आवाज न्यूज नेटवर्क

अहमदनगर – तालुक्यात शेतीपंपांना कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने पाणी उपलब्ध असतानाही शेतीमाल जळून चालला आहे. रोहित्र दुरुस्तीचा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांच्या माथी मारला जातो. महसूल विभागाने पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या गावांमध्ये ५० पैशांपेक्षा जादा आणेवारी लावली आहे. चोरीच्या घटना वाढल्या आहेत, या पार्श्वभूमीवर चोरांचा बंदोबस्त करण्याबरोबरच अन्य प्रमुख मागण्यांसाठी जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे यांच्या नेतृत्वाखाली टाकळी ढोकेश्वर येथे मंगळवारी सुमारे दीड तास रास्ता रोको आंदोलन केलेे.

वीजवितरण कंपनीचे उपअभियंता मंगेश प्रजापती, देवरे, नायब तहसीलदार दत्तात्रय भावले यांनी निवेदन स्वीकारले. बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, माजी सभापती अरुण ठाणगे, माजी सदस्य मधुकर उचाळे, गंगाराम बेलकर, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष अॅड. बाबासाहेब खिलारी, दिलीप ठुबे, उपसभापती विलास झावरे, सोन्याबापू भापकर आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. पारनेर तालुक्यातील २५ रोहित्र जळालेले असून सात दिवसांच्या आत हे रोहित्र बसविण्याचे आश्वासन प्रजापती यांनी दिले.

 टाकळी ढोकेश्वर विभागाचे अभियंता देवरे हे शेतकऱ्यांना उद्धट उत्तरे देत असल्याबद्दल झावरे म्हणाले, यापुढील काळात शेतकऱ्यांना चांगली वागणूक दिली पाहिजे, अन्यथा महावितरणच्या कार्यालयात येऊन या अधिकाऱ्यांचे कपडे उतरवण्यात येतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समज द्यावी, असेही झावरे म्हणाले. या आंदोलनामुळे नगर-कल्याण महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *