facebook
Thursday , March 2 2017
Breaking News
Home / Featured / बीओटी प्रकल्पांचे काम थांबवा

बीओटी प्रकल्पांचे काम थांबवा

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद – बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) तत्वावर सुरू करण्यात आलेले प्रकल्प आहे त्या स्थितीत ताब्यात घ्या, असे आदेश महापालिकेचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी मंगळवारी दिले. आयुक्तांनी या प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला. हे प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहेत.
महापालिकेने २००६पासून ‘बीओटी’तत्वावर बांधकाम करण्याचे धोरण स्वीकारले. त्यानुसार सिद्धार्थ उद्यानात फूड प्लाझा, रेल्वे स्टेशनजवळ व्यावसायिक संकुल, जालना रोडवर दोन व्यापारी संकुले, शहानूरवाडी येथील धोबी घाटाच्या जागेवर युरोपिअन मार्केट उभारण्याची योजना आखण्यात आली. यापैकी फूड प्लाझा आणि युरोपिअन मार्केटचे काम रखडले आहे. औरंगपुरा भाजी मंडई, शहागंज भाजी मंडई आणि वसंत भवन येथील व्यापारी संकुल ही कामे चार वर्षांपूर्वी नव्याने बीओटी मध्ये घेण्यात आली. त्यापैकी एकही काम अद्याप पूर्ण झाले नाही. या सर्व प्रकल्पांचा आढावा घेतल्यानंतर, ‘आहे त्या स्थितीत या प्रकल्पांचे काम थांबवा आणि प्रकल्प महापालिकेच्या ताब्यात घ्या,’ असे आदेश बकोरिया यांनी दिले. त्यामुळे १६ वर्षांपासून सुरू असलेला बीओटीचा खेळ संपेल, असे मानले जात आहे.
शहरातील मोबाइल टॉवर्सचे मूल्यमापन करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या. अनधिकृत टॉवर्स दंड आकारून नियमित करा. एका टॉवरचा उपयोग अनेक ऑपरेटर करीत असतील तर त्या टॉवरचा कर वाढवा, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

अपूर्ण बीओटी प्रकल्प

– सिद्धार्थ उद्यानातील फूड प्लाझा ः बांधकाम एक दशकापासून सुरू
– वसंत भवन ः पूर्णत्वाची मुदत १८ महिने, तीन वर्षांनंतरही काम सुरूच
– औरंगपुरा भाजी मंडई ः पूर्णत्वाची मुदत १८ महिने, तीन वर्षांनंतरही अद्याप काम सुरू झाले नाही
– शहागंज भाजी मंडई ः पूर्णत्वाची मुदत १८ महिने, तीन वर्षांनंतरही अद्याप काम सुरू झाले नाही.
– शहानूरवाडी येथील युरोपिअन मार्केट ः पाच वर्षांपासून काम सुरूच आहे, सध्या आठवडी बाजार भरतो.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *