facebook
Saturday , February 25 2017
Breaking News
Home / Featured / रसिकांना आध्यात्मिक अनुभव

रसिकांना आध्यात्मिक अनुभव

आवाज न्यूज नेटवर्क –

नागपूर – बासरी हे अतिशय मधूर वाद्य आहे. पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी या वाद्याला जागतिक कीर्ती मिळवून दिली. हरिप्रसादजींच्या वाद्याला तोच सुरेलपणा, तोच आध्यात्मिक अनुभव त्यांच्या शिष्या देबोप्रिया व सुचिस्मिता चॅटर्जी यांनी मंगळवारी रसिकांना दिला.

नटराज शिवा आणि गुरुर देवो महेश्वरा या मध्यवर्ती संकल्पनेवर भारतीय शास्त्रीय संगीत व नृत्यकलेतील गुरू-शिष्य परंपरेवर आधारित कालिदास महोत्सवाच्या मंगळवारी तिसऱ्या दिवसाची सायंकाळ बासरी वादनाने अधिक सुरेल झाली. स‌िव्हिल लाइन्समधील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सोमवारपासून कालिदास महोत्सवात नागपूरकरांना सुरेल स्वरांची मेजवानी मिळत आहे.

महोत्सवाच्या आज तिसऱ्या दिवशी बासरी वादक देबोप्रिया व सुचिस्मिता चॅटर्जी यांनी राग बागेश्रीने बासरी वादनाला सुरुवात केली. दोन्ही बहिणींनी उत्कृष्ट ताळमेळ, स्वरालापी सादर करीत रसिकांची मने जिंकली. साथीला असलेल्या तबला वादक ओजस आडियाने त्यांना अतिशय दमदार साथ दिली.

त्यानंतर विदुषी, संशोधक व शिक्षिका डॉ. नीना प्रसाद यांनी मोहिनीअट्टम नृत्य सादर केले. भरतनाट्यम, कुचिपुडी, मोहिनीअट्टम आणि कथ्थकली अशा शास्त्रीय नृत्य प्रकारात तरबेज व प्रतिभा संपन्न असलेल्या नृत्यांगना डॉ. नीना प्रसाद यांनी आपल्या नृत्याने रसिकांनी जागीच खिळवून ठेवले.

कार्यक्रमाला न्या. भूषण गवई, ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार, विभागीय आयुक्त अनुपकुमार, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. पीयूषकुमार आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन रेणुका देशकर व जैनेंद्र सिंग यांनी केले.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *