facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / Featured / ५० विशेष शाळांत खेळांचे धडे

५० विशेष शाळांत खेळांचे धडे

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर – ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये देशातील खेळाडूंना अधिकाधिक यश मिळावे यासाठी जिल्हा सैनिक कल्याण विभागाकडून ‘खेळ क्रांतीचा नारा’ हा पथदर्शी प्रकल्प सुरू केला असून, याला गती मिळाली आहे. १६ प्रकल्पांतर्गत ४ हजार अंगणवाड्यांमधील २ लाख मुलांची खेळासाठी शारीरिक आणि मानसिक तयारी करून घेण्याचे काम या प्रकल्पातून होणार आहे. यासाठी यासाठी जिल्ह्यात ५० विशेष खेळ शाळा सुरू होणार आहेत, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी दिली.

मेजर सासने यांनी खेळांच्या विकासासाठी PPFNS (PRE-PRIMARY FITNESS & SPORTS SCHOOL) मॉडेल तयार केले आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात ५० मार्गदर्शन केंद्र सुरू होणार आहेत. प्रचलित शाळेची सुरूवात होण्याआधीच खेळांच्या दृष्टीने मुलांची शारीरिक क्षमता तयार करण्याचे काम या विशेष शाळांमध्ये होईल. फिटनेसमध्ये स्थिर उडी, भिंतीवरची उडी, बॉल फेकने, शरीरातील लवचिकपणा वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. विविध शंभर व्यायाम प्रकारांतून प्रशिक्षण दिले जाणार आहे. मुलांचा कल तपासून पालकांनाही आवश्यक सूचना देण्यात येतील.. मोठ्या प्रमाणात होणारी स्पर्धा मुलांच्या क्षमता वाढवण्यास उपयुक्त ठरेल, असा विश्वास मेजर सासने यांनी व्यक्त केला.

पीपीएनएफएस हे देशाच्या क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाचे मॉडेल असून, जिल्ह्यात खेळ शाळांचे जाळे उभारण्यास मदत होणार आहे. हरियाणात दहा वर्षांपूर्वी ‘प्ले फॉर इंडिया’ हा प्रकल्प राबवल्यानेच हरियाणात खेळाची क्रांती झाली. याचे परिणाम आता दिसत आहेत. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात पीपीएनएफएस हा पायलट प्रोजेक्ट रुजल्यास जागतिक स्पर्धांसह ऑलिम्पिकमध्ये नक्कीच यश मिळेल, असा विश्वास सासने यांनी व्यक्त केला. प्रकल्पाच्या माहितीसाठी

subhash.sasne@gmail.com, subhash.sasne@gmail.com व मोबाइल नंबर ९९७०८५६४३८ यावर संपर्क साधण्याचे आवाहन सासने यांनी केले आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *