facebook
Wednesday , December 7 2016
Home / Featured / ‘अक्षयकुमारला चोप द्या’
akshay-kumar

‘अक्षयकुमारला चोप द्या’

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – अभिनेता अक्षयकुमार आणि भूमी पेडणेकर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ या सिनेमाचं चित्रिकरण सध्या मथुरेजवळ चालू आहे. परंतु, या चित्रपटातील कथानक येथील परंपरेला मोडणारे आहे असे सांगत, येथील तथाकथित संत-महंतांनी जातपंचायतीचे आयोजन करून चित्रपटाचे दिग्दर्शक नारायण सिंह यांचे जीभ छाटण्याचे फर्मान सोडले आहे. हे काम करणाऱ्यास एक कोटी इनाम देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. तर अभिनेता अक्षयकुमार दिसेल तिथे त्याला चोपण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

‘टॉयलेट…’चे कथानक दोन गावांमध्ये घडते. बरसाना आणि नंदगाव यामध्ये एक विवाहसोहळा होतो असे यात दाखवण्यात आले आहे. संतांच्या म्हणण्यानुसार, यातील एक गाव कृष्णाचे तर एक गाव राधेचे मानले जाते. या दोन्ही गावांमध्ये वर्षानुवर्षे लग्नाची सोयरिक होत नाही. परंतु, चित्रपटांत असा विवाह दाखवून लोकांच्या भावना दुखावण्याचे काम दिग्दर्शक करत आहेत. बरसाना पंचायतीच्या २० सरपंचांनी तीन दिवसांपूर्वी महापंचायतीत याचिका दाखल केली होती. प्रकरण वाढत आहे हे लक्षात आल्यावर, या विवाहाचे दृश्य आपण चित्रपटातून वगळू असा पवित्रा दिग्दर्शकाने घेतला. परंतु, ते न ऐकता बरसानामध्ये सोमवारी महापंचायत भरली व ‘अशी’ गोष्ट रचल्याबद्दल या पंचायतीने दिग्दर्शक नारायण सिंह यांची जीभ छाटण्याची शिक्षा सुनावली. ही जीभ छाटणाऱ्यास एक कोटी रुपये इनाम देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. तर चित्रीकरणाच्या निमित्ताने अभिनेता अक्षयकुमार दिसेल तिथे त्याला बेदम चोप देण्याचे आवाहनही पंचायतीने बरसानावासियांना केले आहे.

‘धार्मिक भावनांचा आदर ठेवून आणि पौराणिक महत्त्व लक्षात घेऊनच आम्ही चित्रीकरण करत आहोत. या चित्रपटात बरसाना आणि नंदगाव यांच्यादरम्यान विवाह संबंधांचे चित्रीकरण केलेले नाही. यासंबंधी मी पंचायतीलाही पत्र लिहिले असून, बरसाना येथे राहणाऱ्या मुलीची भूमिका करणारी भूमी भविष्यात स्वच्छता अभियानाचा चेहरा बनेल, असे दिग्दर्शक नारायण सिंह यांनी सांगितले.

Check Also

boat

कोकणात जाऊ या…बोटीने!

मुंबईः सणासुदीच्या दिवसात ओसंडून वाहणाऱ्या एसटी आणि खासगी टुरिस्ट बसेस… खराब रस्त्यांमुळे प्रवासासाठी लागणारा बारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *