facebook
Sunday , December 11 2016
Home / Featured / घरपट्टीसाठी मनपाची जप्ती मोहीम सुरू
aawaz-news-image

घरपट्टीसाठी मनपाची जप्ती मोहीम सुरू

आवाज न्यूज नेटवर्क – 

जळगाव –  महापालिका प्रशासनाने घरपट्टीची थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांवर जप्तीची मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी १२५ कुलपांची खरेदी केली आहे. मंगळवारी (दि. २२) जप्तीसाठी गेलेल्या ८ मालमत्ताधारकांपैकी ६ जणांनी कराचा भरणा केला आहे.

प्रत्येक प्रभागात १०० टॉप थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत ही थकबाकी वसूल करण्याचे आदेश प्रभाग अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिली. जप्ती मोहीम सुरू असून यासह थकबाकीदार ज्या कार्यालयांमध्ये काम करीत असतील तेथे पत्र पाठवून त्यांच्या पगारातून थकबाकीची रक्कम कपात करून महापालिकेला द्यावी, अशी विनंती करण्यात येणार आहे.

Check Also

news-4

आजपासून एसटीत जुन्या नोटा बंद

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – एसटी प्रवासात प्रवाशांकडून जुन्या पाचशेच्या नोटा स्वीकारणे बंद करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *