facebook
Thursday , December 8 2016
Home / Featured / दरोडेखोर टोळी अटकेत
aawaz-news-image

दरोडेखोर टोळी अटकेत

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – राहू येथील जिल्हा बँकेवर दरोडा टाकणाऱ्या टोळीला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या टोळीने सात जिल्ह्यांतील १७ जिल्हा बँकांच्या शाखेवर सशस्त्र दरोडे टाकून कोट्यवधी रूपयांची लूट केल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडून २०.२९ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
सचिन अप्पा इथापे (वय २७), पृथ्वीराज उर्फ पतंग दत्तात्रय माने (वय २७, रा. कन्हेरगाव, ता. म्हाडा, जि. सोलापूर), माऊली उर्फ पिंट्या शिवाजी सरडे (वय २३), प्रियंका दीपक देशमुख (वय २३),सतीश अप्पा इथापे (वय ३०) आणि मंगल अप्पा इथापे (वय ४६, तिघे रा. चाळीसगाव, जि. जळगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीत इथापे आणि त्याच्या साथीदारांनी १० सप्टेंबर रोजी जिल्हा बँकेवर दरोडा टाकला होता. दोन रखवालदारांना जखमी करून ६५.५७ लाख रुपये लुटले होते. इथापे आणि लोकरे नाव बदलून जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे राहात असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांच्या ‘एलसीबी’ला मिळाली होती. त्यानुसार पोलिस अधीक्षक डॉ. जय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राम जाधव यांचे पथक चाळीसगाव येथे गेले. पोलिसांनी पाच नोव्हेंबर रोजी सचिन इथापेला अटक केली. त्यावेळी त्याने त्याच्याकडे असलेल्या कार्बाइनमधून पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला होता.

पोलिसांनी त्याला अटक करून तपास केला. तपासात त्याच्या साथीदारांनी लुटीच्या रकमेतून स्थावर मालमत्ता घेतल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी माने, सरडे, देशमुख, सतीश इथापे आणि मंगल इथापे यांना अटक केली. या टोळीने राज्यातील १७ बँकांवर दरोडे टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. टाकलेल्या दरोड्यांपैकी नाशिक जिल्ह्यात चार, धुळ्यात दोन, अहमदनगरमध्ये तीन, औरंगाबादमध्ये चार, जळगावातील दोन, पुणे आणि साताऱ्यामध्ये प्रत्येकी एका जिल्हा बँकेच्या शाखेवर आरोपींनी दरोडे टाकल्याचे निष्पन्न झाले.

Check Also

aawaz-news-image

‘पोलिसांची भीती मनातून काढून टाका’

आवाज न्यूज नेटवर्क – जळगाव – कायदा वा नियम हे समाजाच्या भल्यासाठीच असून, त्यांचे जो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *