facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / माऊली मंदिर भिलजी ता. अलिबग ते देवाची आळंदी पायी पालखी
november-news-still002

माऊली मंदिर भिलजी ता. अलिबग ते देवाची आळंदी पायी पालखी

आवाज न्यूज नेटवर्क –

नायगाव-कामशेट – (प्रतिनिधी – नागेश जाधव) – २२ नोव्हेंबरला माऊली मंदिर भिलजी ता. अलिबग ते देवाची आळंदी पायी पालखी निघाली असताना विश्रांतीसाठी दत्तगुरु मंदिर ट्रस्ट नायगाव कामशेट ता. मावळ, जिल्ला पुणे येथे मुक्कामी थांबली होती. या वेळी टोनी दा धाबाचे मालक व ट्रस्टचे अध्यक्ष विजय कुमार चावला यांच्या ट्रस्टच्या वतीने सर्व वारकर्यांना भोजन व निवासाची सोय तसेच वस्त्रदान करण्यात आले होते.

सायंकाळी ह.भ.प. धर्मामहाराज झावरे व ह.भ.प. दौडकर महाराज यांचे किर्तन ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

सकाळी २३ नोव्हेंबर रोजी सर्व वारकर्यांचे चहा व नाष्ट्याची सोय करून व त्यांचे सत्कार करून पालखीचे प्रस्थान झाले.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *