facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / ‘अन्न-औषध’कडून तपासण्या कागदावरच

‘अन्न-औषध’कडून तपासण्या कागदावरच

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर – अन्न आणि औषध प्रशासनाची व्यापक, कडक कारवाई होत नसल्याने शहर आणि जिल्ह्यात खुलेआम गुटखा विक्री सुरू आहे. ती रोखण्यासाठी प्रशासनाने महिन्याला १५ तपासण्या आणि पाच नमुने घेण्याचे ‌उद्दिष्ट पूर्ण करत आहे. केवळ टार्गेट पूर्ण करण्यासाठी तपासण्या केवळ कागदावर होत असल्याचा आरोप होत आहे. यातूनच गुटखा विक्री थांबवण्याऐवजी दिवसेंदिवस ती फोफावत चालली आहे.

काँग्रेस आघाडी सरकारने राज्यात गुटखाबंदी लागू केली, पण त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे अजूनही होताना दिसत नाही. गुटखा विक्री रोखण्याची मुख्य जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाची आहे. त्या विभागाचे शहरात दोन निरीक्षक तर प्रत्येक तालुक्याच्या ‌ठिकाणी अन्न सुरक्षा अधिकारी कार्यरत आहेत. गुटखा बंदीसह अन्न, धान्य, जीवनावश्यक घटकांतील भेसळ, विविध प्रकारचे परवाने देणे अशी कामे त्यांची आहेत. गुटखा बंदी करण्यासाठी नेहमी विशेष पथक कार्यरत ठेवण्यासाठी मनुष्यबळ नाही. सर्वत्र कारवाया करण्यावर मर्यादा येत आहेत, असे अन्न व औषध प्रशासनाचे म्हणणे आहे. याउलट असलेले अधिकारीही गुटखा रोखण्यासाठी फारसे काही करत नाहीत. तपासणीच्या नावाखाली चिरीमिरी गोळा करत असतात, अशा व्यसनविरोधी जागृती करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी आहेत.

तपासणीसाठी आल्यानंतर गुटखा सापडतो. त्यानंतर संबंधित अ‌धिकाऱ्याला चिरीमिरी दिल्यास कारवा‌ईविना सहीसलामत सुटता येते, असे वास्तव नेहमीच अनुभवायला येत आहे. मुनष्यबळ नाही त्यामुळे व्यापक प्रमाणात कारवाई होऊ शकत नाही, हे एक कारण प्रशासनाकडून नेहमी पुढे केले जाते. त्यात तथ्य असले तरी काही अधिकारी मुख्य कामांपेक्षा चिरीमिरी गोळा करण्याचे काम अधिक जोमाने करतात, ही वस्तूस्थिती नाकारता येणार नाही. म्हणूनच शहरातील सर्वच भागात अनेक दिवसांपासून गुटखा विक्री उघडपणे सुरू असल्याचे दिसत आहे.

प्रशासनाच्या मर्यादा, कारवाई होऊ नये म्हणूनची मॅनेज करण्याच्या यंत्रणेमुळे गुटखा विक्रीवाले मोकाट आहेत. दिवसेंदिवस ते व्यवसाय वाढवत आहेत. नव्या ग्राहकांना गुटख्याची भुरळ घालत आहेत. परिणामी गुटखाबंदीचा बोजवारा उडला आहे. कारवाईची भीती नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे बंदी नसून परवानाच आहे इतक्या धाडसीपणे विक्रेते सर्वच चौकातील पानटपऱ्यावर गुटखा विक्री करत आहेत.

…………………………..

सर्वाधिक विक्रीची ठिकाणे

निर्माण चौक, निवृत्ती चौक, पार्वती टॉकीज, दौलतनगर, राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, दसरा चौक, बसस्थानक परिसर.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *