facebook
Monday , April 24 2017
Breaking News
Home / Featured / ‘एडीसीए’ची घटना लोढा कमिटीनुसार

‘एडीसीए’ची घटना लोढा कमिटीनुसार

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद – न्या. आर. एम. लोढा यांनी शिफारस केल्याप्रमाणे आैरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या सर्व आजीव सभासदांनी नव्याने घटना तयार करण्याचा प्रस्ताव ५ डिसेंबरपर्यंत सादर करावा, असा आदेश धर्मादाय सहआयुक्त श्रीकांत भोसले यांनी बुधवारी दिले.
हंगामी समिती स्थापन करण्याचा निर्णय आजीव सभासदांच्या बैठकीत घेण्यात आला होता. या समितीवर शिक्कामोर्तब करावे, अशी विनंती अर्जात करण्यात आली आहे.न्या. आर. एम. लोढा यांनी शिफारस केल्याप्रमाणे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या आदेशानुसार आैरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेची नव्याने घटना तयार केली जाईल. घटनेचा प्रस्ताव तयार करून तो कोर्टात सादर करण्याचे आदेश भोसले यांनी दिले आहेत. मंगळवारी संघटनेच्या आजीव सभासदांची बैठक झाली. त्याचा मसुदा कोर्टाला देण्यात आला. सभासदांनी त्यावर स्वाक्षरी केली आहे. त्याची पडताळणी करण्याचे आदेश अधीक्षक संजय जोशी यांना दिले. त्यांनी पडताळणी करून १७ नावे कोर्टाकडे सादर केली.
औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचा फेरफार अर्ज सय्यद विलायत हुसेन कादरी यांनी फेटाळला ३१ ऑगस्ट रोजी फेटाळला होता. या अर्जाबरोबरच नवीन ४८ आजीव सभासदांसह अर्जदार सचिन मुळे, आक्षेपकर्ते वसंत शर्मा, मोहन बोरा, सुहास कुलकर्णी यांचे सभासदत्व अवैध ठरविण्यात आले होते. या आदेशाला धर्मादाय सहआयुक्त श्रीकांत भोसले यांच्या कोर्टात आव्हान देण्यात आले आहे. मूळ अर्जदार सचिन मुळे यांच्यातर्फे प्रमोद पाटणी तर अतुल कराड, शिरीष बोराळकरसह १८ जणांची बाजू आनंद चावरे मांडत आहेत. बोरा, शर्मा, कुलकर्णी यांच्यातर्फे श्रीपाद कुलकर्णी आणि मोहन बोंबले यांच्यातर्फे गणेश अनसिंगकर हे काम पाहत आहेत.

घटनेचे अधिकार

न्या. लोढा यांनी शिफारस केलेली घटना सादर करावी. त्याचबरोबर या घटनेत दुरुस्त्या सुचविण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. कोर्टाकडे सादर करण्यात आलेला अर्ज पडताळणी करून त्यातील त्रुटी पूर्ण केल्यावर त्या अर्जाचे रुपांतर महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त मंडळ कायद्यातील ५० (अ) या कलमांमध्ये करण्यात येईल. या कलमात कोर्टाला घटना तयार करण्याचे व आवश्यक ते बदल करण्याचे अधिकार आहेत.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *