facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / Featured / ‘गुडनाइट’ प्यायल्यानं बालकाचा मृत्यू

‘गुडनाइट’ प्यायल्यानं बालकाचा मृत्यू

आवाज न्यूज नेटवर्क –

नाशिक – टाकळीरोडवरील रामदास स्वामीनगर परिसरातील अवघ्या १४ महिन्यांच्या बालकाने डास प्रतिबंधक गुडनाइट लिक्विड प्राशन केल्याने त्याचा मृत्यू झाला. या खळबळजनक घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. उपनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टाकळीरोडवर रामदास स्वामीनगरमधील गल्ली क्रमांक दोनमध्ये सिध्दकला बंगल्यात रहणाऱ्या अमरिश कुलकर्णी यांचा चौदा महिन्यांचा शौर्य हा मुलगा घरात खेळत होता. कोणाचे लक्ष नसताना त्याने डासांना प्रतिबंध करणारे गुडनाइट लिक्विड प्राशन केले. कुटुंबीयांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी वेळ न दवडता त्याला वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. मात्र, शौर्यची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, हवालदार चौधरी तपास करत आहेत. शौर्यच्या मृत्यूला महापालिका प्रशासन जबाबदार असल्याची चर्चा परिसरात होती. नाशिकरोडच्या जेलरोड, उपनगर, टाकळी आदी भागात डासांची समस्या कायम आहे. तरीही नियमित औषध फवारणी केली जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *