facebook
Monday , February 27 2017
Breaking News
Home / Featured / थंडीमुळे रुळांना तडे जाणे वाढले

थंडीमुळे रुळांना तडे जाणे वाढले

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – मध्य रेल्वेवर काही दिवसांपासून रेल्वे रुळांना तडे जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हिवाळ्यात रूळ आकुंचन पावत असल्याने तडे जाण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी रेल्वेने सकाळी ६ ते ८ या वेळेत पाहणी करण्यासाठी जादा गँगमनची नियुक्ती केली आहे.

मध्य रेल्वेवर सोमवारी एका दिवसात तीन वेळा रुळांना तडे गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता. केवळ हिवाळा नव्हे, तर उन्हाळ्यातही अनेकदा रुळांना तडे जातात. यंदा जानेवारीत १७ वेळा रुळांना तडे गेल्याच्या घटनांची नोंद झाली होती. सकाळी रुळांना तडे जात असल्याचे आढळून येत असल्याने त्यावेळी जादा गँगमन नियुक्त करण्यात आल्याचे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रवींद्र गोयल यांनी सांगितले.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *