facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / Featured / थकबाकीदार रडारवर

थकबाकीदार रडारवर

आवाज न्यूज नेटवर्क –

नाशिक – हजार व पाचशेच्या नोटा भरण्याची सवलत देऊनही थकबाकी न भरणाऱ्या १७ हजार ७६६ थकबाकीदारांविरोधात महापालिका आक्रमक झाली असून, बड्या दीडशे थकबाकीदारांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. गुरुवारी यातील तीन बड्या थकबाकीदारांची मालमत्ता सील करण्यात आली. आतापर्यंत २४ मालमत्ताधारकांना जप्ती वॉरंट बजावले असून, पाच मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.

नोटांबदीनंतरही राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना हजार व पाचशेच्या नोटा स्वीकारण्यास संमती दिली आहे. येत्या २४ नोव्हेंबरपर्यंत ही मुदत दिल्याने पालिकेने विविध करांची वसुली मोहीम जोरात सुरू आहे. चालू वर्षाच्या खातेदारांसह दहा हजारांपुढील थकबाकीदार असलेल्या १७ हजार ७६६ थकबाकीदारांवरही लक्ष केंद्रित केले आहे. पालिकेने या सर्व सतरा हजार थकबाकीदारांना नोटिसा पाठविल्या. परंतु, यातील बड्या थकबाकीदारांनी त्यालाही दाद दिलेली नाही. त्यामुळे या थकबाकीकादांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे.

शहरातील १७ हजार ७६६ थकबाकीदारांकडे जवळपास ६० कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे पालिकेच्या वतीने सहा विभागात आतापर्यंत २४ जप्ती वॉरंट बजावले आहेत. त्यापैकी १५ मालमत्ताधारकांनी १६ लाखांची थकबाकी जमा केली आहे. गुरुवारी शहरातील तीन बड्या थकबाकीदारांवर कारवाई करण्यात आली. त्यात पाथर्डी फाटा येथील डॉ. धाडीवाल कांतिलाल तोलाराम यांच्या ओपन प्लॉटवरील गाड्यांचे पार्किंग शोरूम जप्त केले. त्यांच्याकडे ४ लाख ४३ हजारांची थकबाकी होती. थकबाकी भरण्यास नकार दिल्यानंतर उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी ही मालमत्ती सील करण्याची कारवाई केली. पाथर्डी येथीलच हॉटेल द पाम यांनाही वॉरंट बजावले होते. परंतु, त्यांनी पथकाला पाहताच ७ लाख ५३ हजारांची थकबाकी जागेवर भरली. त्यानंतर हाफीज उल्ला शौकतअली यांनाही वॉरंट बजावले होते. त्यांनीही लगेच १ लाख ७८ हजारांची थकबाकी भरली.

बड्या धेड्यांचा समावेश

विविध कर विभागाने १७ हजार थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या असल्या तरी, त्यातील पहिल्या टप्प्यात टॉपमोस्ट अशा दीडशे थकबाकीदारांची यादीच तयार केली आहे. यामध्ये शहरातील राजकारणी, व्यावसायिक, उद्योजक, हॉटेल व्यावसायिक यांच्यासह काही राजकीय पक्षांच्या कार्यालयांचा समावेश आहे.

स्वतंत्र पथकाची स्थापना

विविध कर विभागाने बड्या थकबाकीदारांवरील कारवाईसाठी आता स्वतंत्र पथकाची स्थापना केली आहे. मुख्यालयातूनच हे पथक स्थापन करण्यात आले असून, त्यात प्रत्येक विभागातील एक इन्स्पेक्टर व सहकारी असे जवळपास दहा कर्मचारी असतील. उपायुक्त या पथकावर लक्ष ठेवणार असून, त्यांच्या देखरेखखाली दररोज वॉरंट बजावण्यासह जप्तीची कारवाई केली जाणार आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *