facebook
Saturday , February 25 2017
Breaking News
Home / Featured / नागपूर मेट्रोला हायकोर्टाची नोटीस

नागपूर मेट्रोला हायकोर्टाची नोटीस

आवाज न्यूज नेटवर्क –

नागपूर – नागपूर सुधार प्रन्यासने उज्ज्वल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतील भूखंड परस्पर नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला देण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठसमोर सादर करण्यात आली आहे. त्यावर हायकोर्टाने नगर रचना विभागाचे सचिव, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती, महापालिका आयुक्त आणि नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या महाव्यवस्थापकांना नोटीस बजावून दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला आहे.

सोसायटीचे सचिव प्रदीप मंडलेकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्या. वासंती नाईक आणि न्या. स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. याचिकाकर्त्यानुसार सोसायटीने सोमलवाडा येथे १९७१मध्ये जमीन खरेदी करून ले-आऊट आखले होते.त्यात नागपूर सुधार प्रन्यासने ले आऊटला मान्यता देत असताना सार्वजनिक उपक्रमासाठी असणारी मोकळी जागा नासुप्रकडे राहील, अशी अट घातली होती. त्यानुसार सोसायटीने ७ हजार ५०० चौरस मीटरचा भूखंड सार्वजनिक उपक्रमासाठी राखीव ठेवला, मात्र, नासुप्रकडे त्याचा ताबा देण्यात आला नव्हता. दरम्यान, नागपूर मेट्रोरेल्वे कॉर्पोरेशनने मार्च २०१६ मध्ये सोसायटीला पत्र पाठवून मोकळी जागा मेट्रोच्या कामासाठी संपादीत करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्या प्रस्तावाला सोसायटीने मंजुरी दिली होती. त्यावेळी मेट्रोकडून सोसायटीला जमिनीचा मोबदलादेखील देण्यात येणार होता. परंतु, सोसायटीला विश्वासात न घेता नासुप्रने परस्पर सदर जागा मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला हस्तांतरित केली. त्यानंतर मेट्रोने त्या जमिनीचा ताबा घेत तिथे सदर जागा मेट्रोच्या मालकीची असल्याचे फलकही लावले.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *