facebook
Monday , February 27 2017
Breaking News
Home / Featured / पुण्यातील तिघांची ‘एनडीए’त निवड

पुण्यातील तिघांची ‘एनडीए’त निवड

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १३७ व्या तुकडीमध्ये पुण्यातील तिघांची निवड झाली आहे. अनिकेत साठे, तुषार नायर आणि प्रसाद कोहिनकर अशा निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे ‘एनडीए’त प्रवेश घेण्यासाठी झालेल्या प्रवेश परीक्षेत त्यांना अखिल भारतीय गुणवत्ता यादीत अनुक्रमे ६७, २१० आणि २७८ असे क्रमांक मिळवले आहे.
अनिकेत (वय १९) कोथरूडचा असून, सध्या तो फर्ग्युसन कॉलेजमध्ये विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षात शिकत आहे. तुषार (वय १९) कॅम्प परिसरात राहात असून, सिंहगड अॅकॅडमी ऑफ इंजिनीअरिंगला प्रथम वर्षात शिकत आहे. प्रसाद (वय १९) मुंढवा परिसरात राहत असून, पुणे विद्यार्थी गृहाच्या इंजिनीअरिंग कॉलेजात प्रथम वर्षात शिकत आहे. या तिघांना अॅपेक्स करियर्स प्रशिक्षण संस्थेचे संचालक लेफ्टनंट कर्नल प्रदीप ब्राम्हणकर (निवृत्त) यांचे मार्गदर्शन मिळाले.
अनिकेत क्रिकेट खेळाडू असून, त्याने क्रॉसकंट्री आणि व्यायामाच्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. तुषार आणि प्रसाद फुटबॉल खेळाडू आहेत. तुषारला पोहण्याची आणि बास्केटबॉल खेळण्याची आवड आहे. प्रसादला फोटोग्राफी आणि चित्रकलेची आवड आहे.

अनिकेतचे विशेष कौतुक
अनिकेतचे वडील अमरेंद्र साठे यांचे ऑगस्ट २०१६मध्ये निधन झाले. या घटनेच्या १५ दिवसानंतरच अनिकेतने प्रवेशासाठी आवश्यक असणारी मुलाखत दिली आणि त्याची आता एनडीएमध्ये निवड झाली आहे. त्यामुळे अनिकेतने अतिशय कठीण परिस्थितीत मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे कौतुक होत आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *