facebook
Thursday , March 2 2017
Breaking News
Home / Featured / प्रचारासाठी नेत्यांची ‘उड्डाणे’

प्रचारासाठी नेत्यांची ‘उड्डाणे’

आवाज न्यूज नेटवर्क –

नाशिक – नोटाबंदीच्या समस्येला देशभरात तोंड दिले जात असतानाच जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या निवडणूक प्रचारासाठी विविध पक्षाच्या नेत्यांची मात्र हवाई उड्डाणे सुरू आहेत. विशेष म्हणजे, नोटाबंदीची समस्या नेत्यांच्या भाषणात आणि निवडणूक प्रचारात प्रमुख मुद्दा आहे. प्रचारासाठी राज्यभरात ८ ते १० हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे.

नगरपालिका निवडणुकांचा इतिहास पाहता यंदाच्या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्यासह हायटेक प्रचार यंत्रणा, सोशल मीडियाचा वापर, वाढलेली जागरुकता अशा विविध कारणांमुळे निवडणुकीचा ज्वर वाढला आहे. यंदाच्या निवडणुकीत तर हेलिकॉप्टर आणि विमानासारख्या हवाई वाहतुकीच्या साधनांचा मोठा वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेल्या आठवड्यात मनमाड आणि सिन्नर येथे जाहीर सभा झाली. त्यासाठी कोपरगावहून हेलिकॉप्टरने मनमाड येथील सेंट झेविअर स्कूलच्या हेलिपॅडवर त्यांचे आगमन आले. मनमाड येथील प्रचार झाल्यानंतर हेलिकॉप्टरने ते सिन्नर येथे आले. त्यानंतर नाशिकमध्ये स्वागत समारंभासाठी ते उपस्थित झाले होते. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची सुद्धा मनमाड येथे प्रचारसभा झाली. त्यासाठी त्यांचे हेलिकॉप्टरने मुंबईहून नाशिकच्या फ्रावशी अकॅडमी येथील हेलिपॅडवर आगमन झाले. तेथून त्या हेलिकॉप्टरने मनमाड येथे गेल्या. मनमाडची प्रचार सभा आटोपल्यानंतर त्यांनी हेलिकॉप्टरद्वारे पाथर्डी (अहमदनगर) येथील प्रचार सभेकडे कूच केली. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हेसुद्धा सटाणा येथील प्रचारसभेसाठी दाखल झाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सत्ताधारी पक्षाचे नेते आणि मंत्री हेलिकॉप्टरने येत असताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हेसुद्धा मागे नसल्याचे दिसून आले आहे.

तासाला ७० ते ८० हजार रुपये

राज्यभरात नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे अधिकाधिक सभा घेण्यासाठी हेलिकॉप्टर हे माध्यम प्रभावी ठरत आहे. त्यामुळे त्याची मागणी वाढत आहे. चार ते पाच आसनी हेलिकॉप्टरला अधिक मागणी आहे. सध्या प्रती तासाला ७० ते ८० हजार रुपये हेलिकॉप्टरसाठी आकारले जात आहेत. विशेष म्हणजे, उमेदवारांच्या निवडणूक खर्चात हेलिकॉप्टरचे भाडे दाखविले जाईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
निवडणूक प्रचारात हेलिकॉप्टरचा वापर हे नवीन नाही. नगरपालिका निवडणुका असला तरी विधानसभा निवडणुकीसारखाच माहोल आहे. प्रचारासाठी कमी वेळ मिळाला असल्याने अधिकाधिक ठिकाणी जाण्यासाठी हेलिकॉप्टर हे उपयुक्त साधन आहे. त्यामुळे मागणी वाढली आहे.

– मंदार भारदे, संचालक, मॅब एव्हिएशन

——————————-

महाराष्ट्रात नगरपालिकेसारख्या निवडणुकीसाठी हेलिकॉप्टरचा वापर होणे ही खूप चांगली बाब आहे. राज्याच्या विविध भागात कमी वेळेत पोहोचणे यातून शक्य होत आहे. चार ते पाच आसनी हेलिकॉप्टरला मागणी आहे.

– कॅप्टन उदय गेली

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *