facebook
Monday , February 27 2017
Breaking News
Home / Featured / महामार्गाची आठवड्यात अधिसूचना

महामार्गाची आठवड्यात अधिसूचना

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद – मुंबई-नागपूर या ७१० किलोमीटरच्या सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वेच्या भूसंपादनासाठी मार्किंगच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून, जिल्ह्यातील ५९ गावांतील १३८० हेक्टर जमीन संपादन करण्यासाठी येत्या आठ दिवसांमध्ये अधिसूचना काढली जाणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी, भूसंपादन अधिकारी शशिकांत हदगल यांनी दिली.
औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील १५५ किलोमीटर अंतर हा महामार्ग व्यापणार आहे. या मार्गावर ४ टाउनशिप उभारण्यात येणार आहेत. रोड आणि टाउनशिप मिळून साडेचार हजार हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. रस्ते विकास महामंडळाकडून तयार करण्यात येणाऱ्या या महामार्गासाठी भूसंपादन करताना आंध्र प्रदेशातील अमरावती पॅटर्न वापरला जाणार अाहे.
रस्ते विकास महामंडळाकडून जिल्ह्यात ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिमच्या ‌(जीपीएस) सहाय्याने मार्किंगच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून, खांब रोवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील ५९ गावांमधील १३८० हेक्टर जमीन संपादनाची प्रक्रिया राबवण्यासाठी आठ दिवसांत अधिसूचना काढण्यात येणार अाहे. त्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधला जाईल. जमीन संपादन करण्यापूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घेतले जाणार आहे.
हा महामार्ग राज्यातील नागपूर, अमरावती, औरंगाबाद व नाशिक व कोकण या पाच महसूल विभागांतील नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक व ठाणे या दहा जिल्ह्यांतून जात आहे. महामार्गावर २७ तालुक्यांतील ३५० गावे आहेत. नागपूर ते भिवंडी या ७१० किलोमीटर अंतराच्या या नियोजित मार्गाची आखणी प्रामुख्याने जास्त लोकवस्ती, बागायती जमीन, मोठी धरणे, वनजमिनी, जलाशये आणि जंगले टाळून करण्यात आली आहे. मार्गाची रुंदी १२० मीटर एवढी असेल. त्यामुळे निव्वळ रस्त्यांसाठी नऊ हजार हेक्टर आणि त्याच्या जोडरस्त्यांसाठी एक हजार हेक्टर याप्रमाणे एकूण १० हजार हेक्टर जमीन आवश्यक आहे.

असा असेल महामार्ग…
नागपूर – सेलडोह – वर्धा – येळी -पुलगाव- धामणगाव- वखफळी- कारंजा लाड- सेलू बाजार – मालेगाव – मेहकर- दुसरबीड- सिंदखेड राजा- जालना-शेंद्रा- औरंगाबाद- सावंगी- दौलताबाद-लासूर- वैजापूर- शिर्डी- गोंदे- पिंपळगाव मोर-घोटी, देवळी-खर्डी-शहापूरजवळील कासेगाव-वडपे (भिवंडी बायपास) असा हा एक्स्प्रेस वे असेल. पुढे ते कापूरबावडी जंक्शनवरून मुंबई असा जाईल.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *