facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / मेट्रो रेल ‘ब्राव्हो’

मेट्रो रेल ‘ब्राव्हो’

आवाज न्यूज नेटवर्क –

नागपूर – छत्रपती चौकातील उड्डाणपूल तोडण्याचे काम बुधवारी रोखण्यात आले. पंधरा दिवसात हा पूल तोडण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. ते आठवडाभरातच पूर्ण करण्यात आले. यामुळे ‘मेट्रो रेल’ प्रशासनाचे कौतूक होत आहे. सोबतच पूल तोडण्याचे कंत्राट मिळालेल्या कंपनीचेही नागरिकांनी अभिनंदन केले.

जुना पूल तुटल्याचे दु:ख असले तरी, नवा पूल होणार असल्याने नागरीकांमध्ये आनंद आहे. बुधवारी या मार्गावरील १५ नोव्हेंबरपासून रोखण्यात आलेली वाहतूक पुन्हा सुरू झाली. त्यानंतर नागपूरकरांनी सुटकेचा श्वास घेतला. सोडला. सोबतच पुढील काळात ऐतिहासिक अशा या घटनेचे साक्षीदार असल्याचा अभिमानही व्यक्त केला. या पुलाचा जवळपास १५ हजारावर क्युबिक मीटर मलबा निघाला. तर, मोठ्या प्रमाणात लोखंडी सळाखा निघाल्या असून, त्याचे ढिगच तयार झाले होते.

गेल्या १५ नोव्हेंबरपासून हा उड्डाणपूल तोडण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली होती. त्याला सातव्या दिवशीच पूर्णत: साफ करण्यात आला. त्यानंतर रस्त्यावरील मलबा व लोखंडी सळाखी हटविण्याचे काम युध्दपातळीवर घेण्यात आले. सोबतच मलब्यामुळे व इतर कामामुळे रस्त्यांवर खड्डे पडले होते. हे खड्डे बुजविल्यानंतर छत्रपती चौकासह वर्धा रोड व नरेंद्रनगरकडून रिंग रोडकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.

सात दिवसात उड्डाणपुलाचे दोन्ही बाजूचे रॅम्प, स्लॅब तसेच दोन पिलरही तोडण्यात आले. स्लॅबचा मलबा तातडीने रस्त्यांवरून हलविण्यास प्राधान्य देण्यात आले. दोन्ही बाजूच्या रॅम्पमधील गिट्टी, माती उपसण्याचे काम जोरात करण्यात आले. रॅम्प तोडल्यानंतर लगेच कॉम्बीक्रशरच्याच सहाय्याने त्याचे लहान-लहान तुकडे करण्यात येत होते. त्यातून सळाखी वेगळ्या करण्यात येत होत्या. सळाखी तोडल्यानंतर त्यांनाही चौकातून रस्त्याबाहेर करण्यात येत होत्या. मंगळवारपर्यंत जवळपास ९८ टक्के काम पूर्ण झाले होते. बुधवारी सर्व पूल तोडून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करण्यात आला. बुधवारी सायंकाळी ५ वाजता हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने नागरीकांनी आनंद व्यक्त केला. वर्धा रोड व नरेंद्रनगर ते जयताळा हा मार्ग अत्यंत वर्दळीचा आहे. रोज लाखो वाहनचालक व वाहने या मार्गावरून येजा करतात. पुल तोडण्याच्या कामामुळे या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली. त्यामुळे नोकरी करणारे व कामांसाठी घराबाहेर पडणाऱ्यांना १५ ते २५ मिनीटे आधीच निघावे लागायचे.

कुतूहल कायमच

उड्डाणपूल तोडणे सुरू असताना रात्रभर अनेकजण कुतूहलापोटी बघायला असायची. अनेक कुटुंब रात्री उशिरापर्यंत या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनण्यासाठीचे क्षण डोळ्यात साठवत होते. एखादा उभा असलेला उड्डाणपूल तोडण्याचा प्रकार पहिल्यांदाच अनेकांनी डोळ्यांदेखत बघितला. त्यामुळे या संपूर्ण कामाबद्दल नागपूरकरांमध्ये उत्सुकता होती. रोज येजा करीत असलेला व भव्य असा हा पुल आता कुठे गेला, असा जणू आश्चर्याचा धक्काच अनेकांना होत आहे. त्यामुळे पूल तोडणे व आता पूल नाहीसा होणे, असा सर्व कुतूहलाच खेळ राह‌ील. आजही चौकात उभे राहून अनेकजण बघण्याचेच कुतूहल करीत आहेत.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *