facebook
Sunday , December 11 2016
Home / Featured / कारवाईतून दोन मंदिरे वगळली
news-14

कारवाईतून दोन मंदिरे वगळली

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – अनधिकृत २६ मंदिरे पाडण्यासाठी आवश्यक कागदोपत्री प्रक्रिया सुरू केल्यानंतर दोन मंदिरांबाबतचे आवश्यक पुरावे दाखल झाल्याने ही दोन्ही मंदिरे मनपाने कारवाईतून वगळली आहेत. केडगावच्या वैष्णवनगरचे दत्तमंदिर व सिव्हील हडकोमधील जैन स्थानकाचा यात समावेश आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात सहा मंदिरांना नोटिसा डकविण्यात आल्यानंतर आता पुढच्या टप्प्यात राहिलेल्या १८ मंदिरांना अशा नोटिसा डकवण्याचा निर्णय आज घेण्यात आला.

पहिल्या टप्प्यात नोटिसा दिलेल्या सहा मंदिरांमध्ये सावेडीच्या भिस्तबाग महालाजवळील मारुती मंदिर तसेच श्रीगजानन महाराज मंदिर (नवलेनगर, गुलमोहोर रोड, सावेडी), गणेश मंदिर (निर्मलनगर, सावेडी), म्हसोबा मंदिर (गणेश चौक, बोल्हेगाव), गणेश मंदिर, (बोहरी चाळ, रेल्वे स्टेशन रोड) व काळूबाई मंदिर (वडारगल्ली, केडगाव) यांचा समावेश आहे.

दोन मंदिरे वगळली

मनपाने शहरातील ५७४ सर्वधर्मीय धार्मिक स्थळांची यादी जाहीर केली असली तरी यातील केवळ तीन मंदिरांनाच सर्वप्रकारची परवानगी आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात यातील केवळ मनपाच्या जागेत असलेल्या २६ मंदिरांवरच कारवाईची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. ही मंदिरे २९ सप्टेंबर २००९पूर्वीची असल्याचे पुरावे सादर करण्याचे आवाहन मनपाने केले होते. त्यानुसार वर्धमान जैन स्थानक (सिव्हिल हडको) व दत्त मंदिर (वैष्णवनगर, केडगाव) या मंदिरांचे असे पुरावे मनपाला मिळाले. त्यामुळे ही दोन्ही मंदिरे कारवाईतून वगळण्यात आली आहेत. राहिलेल्या २४पैकी सहा मंदिरांना नोटिसा दिल्या असून, आता उतरलेल्या १८ मंदिरांना नोटिसा देण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. या मंदिरांमध्ये विठ्ठल-रुक्मिणी मंदिर (टीव्ही सेंटर, सावेडी), जयवैष्णव माता मंदिर (क्रांती चौक, सिव्हील हडको), गणेश मंदिर (आदर्श कॉलनी, प्रोफेसर कॉलनी चौक, सावेडी), संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर (संचारनगर, सावेडी), मच्छिंद्रनाथ मंदिर (लोणार गल्ली, सर्जेपुरा), साईबाबा मंदिर (वाघगल्ली, नालेगाव), विठ्ठल मंदिर (शिवाजीनगर, केडगाव), रेणुका देवी मंदिर (पाटील कॉलनी, केडगाव), गणेश मंदिर (सारसनगर, माळीवाडा), महादेव मंदिर (औसरकर मळा, माळीवाडा), विठ्ठल-रुक्मिणी मंदिर (नानाजी नगर, जुन्या व्हीडीओकॉन पुलाजवळ), शनिमंदिर (जिजामाता उद्यान, भवानीनगर), लक्ष्मीमाता मंदिर (सारसनगर, माळीवाडा), विठ्ठल-रुक्मिणी मंदिर (मोतीनगर, केडगाव), साईनाथ मंदिर (रेणुकानगर, केडगाव), मारुती मंदिर (इंडियन ह्युब पाइक, अरणगाव रोड) विठ्ठल-रुक्मिणी मंदिर (हनुमाननगर, अरणगाव रोड व विठ्ठल-रुक्मिणी मंदिर (मोतीनगर, केडगाव) यांचा समावेश आहे.

अद्याप पुरावे नाहीत

मनपाच्या महासभेत मंदिर कारवाईला जोरदार विरोध करणाऱ्या नगरसेवकांकडून अद्याप कोणतेही पुरावे दिले गेले नसल्याचे समजते. मनपा प्रशासनाने २५ नोव्हेंबरपर्यंत असे पुरावे देण्याचे आवाहन केले असल्याने अजून दोन दिवसांची मुदत आहे. सध्या मात्र मनपा प्रशासनाला निवेदने देऊन फेरसर्वेक्षणाचा आग्रह धरला जात आहे. प्रशासनाकडून मात्र पुरावे देण्याचे त्यांना आवर्जून सांगितले जात आहे.

Check Also

news-4

आजपासून एसटीत जुन्या नोटा बंद

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – एसटी प्रवासात प्रवाशांकडून जुन्या पाचशेच्या नोटा स्वीकारणे बंद करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *