facebook
Wednesday , December 7 2016
Home / Featured / कारागृहातील कैद्यांकडे सापडले सात मोबाइल
aawaz-news-image

कारागृहातील कैद्यांकडे सापडले सात मोबाइल

आवाज न्यूज नेटवर्क –

नाशिक – नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याकडून सोमवारी (ता. २१) मोबाइल जप्त केला असतानाच मंगळवारी रात्री प्रशासनाने घेतलेल्या झडतीसत्रात कैद्यांकडे सात मोबाइल आणि सीमकार्ड सापडल्याने खळबळ उडाली आहे.

कारागृह अधिकारी वामन तुकाराम निमजे यांच्या तक्रारीवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नाशिकरोड कारागृहात नीलेश ज्ञानेश्वर देसले या कैद्याकडे सोमवारी मोबाइल सापडला होता. त्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले होते. मंगळवारी रात्री कारागृह अधीक्षक रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारागृह अधिकारी वाय. बी. फड, बी. एम. लटपटे, पी. डी. बाबर, उपअधीक्षक प्रमोद वाघ, एस. बी. कोकणे, एल. टी. कानसकर, एम. के. खैरगे आदींसह सुरक्षा रक्षकांनी बॅरेकांची अचानक तपासणी सुरू केली. त्यामध्ये मंडल क्र. सातमधील बॅरेक क्र. २, ३, ४, ५, ६ मध्ये इंटेक्स, सॅमसंग व अन्य कंपन्यांचे सात मोबाइल, तसेच एक सीमकार्ड सापडले. निमजे यांच्या तक्रारीवरून नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Check Also

खो-खोत जय हिंद, शिवभक्त जेते

जिल्हा खो-खो संघटना व समर्पण नाशिकतर्फे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर सुरू असलेल्या अखिल भारतीय आमंत्रितांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *