facebook
Saturday , December 10 2016
Home / Featured / तक्रारीच्या रागातून बालकावर गोळीबार
news-16

तक्रारीच्या रागातून बालकावर गोळीबार

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – आपल्या विरोधात श्रीगोंदा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद देण्यास गेल्याचा राग मनात धरून वडाळी येथील माजी सैनिक संजय सीताराम काटे याने किरण भास्कर कांडेकर (वय वर्षे ५ रा. सुरोडी) या कोवळ्या मुलावर गोळीबार केला. त्याच्या दोन्हीही पायावर गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला असून काटे याला अटक करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास वडाळी-सुरोडी शिवारातील कांडेकर वस्तीवर ही घटना घडली.

याबाबत सविस्तर हकीगत अशी, सुरोडी-वडाळी शिवेलगत वडाळी शिवारात माजी सैनिक संजय काटे याची व सुरोडी हद्दीत भास्कर व भाऊसाहेब दादा कांडेकर यांची जमीन आहे. गेल्या वर्षापासून मेजर काटे पिकात जनावरे घालून पिकाचे नुकसान करत असे. बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मेजर काटे याने कांदा व गहू या पिकातून जनावरे नेली. त्यावर पिकाचे नुकसान का केले असे भाऊसाहेब कांडेकर यांनी विचारले. त्यावर काटे याने कांडेकरांच्या डोक्यावर दगडाने मारहाण केली. भाऊसाहेब रक्तबंबाळ झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तसेच श्रीगोंदा पोलिस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी त्यांना नेण्यात आले. आपल्याविरुद्ध फिर्याद दाखल होईल याचा राग मनात धरून मेजर काटे याने

स्वत:च्या बारा बोअरच्या बंदुकीतून भाऊसाहेब यांची पत्नी रोहिणी हिच्यावर गोळ्या झाडल्या. पण तिने त्या चुकवल्या. बेधुंद झालेल्या काटेने ‘मी माजी सैनिक आहे. मला तीन खून माफ आहेत’ अशी भाषा वापरून पाच वर्षांचा मुलगा किरण याच्या पायावर दोन गोळ्या झाडल्या. त्यात तो दोन्ही पायांनी जबर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी नगर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी काटे याला अटक करण्यात आली. पोलिस निरीक्षक साहेबराव कडनोर पुढील तपास करत आहेत.

Check Also

fadnavis

मराठा आरक्षण देणारच : देवेंद्र फडणवीस

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी ‌विधानसभेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *