facebook
Thursday , December 8 2016
Home / Featured / पेंग्विन मृत्यूच्या चौकशीचे आदेश
penguin-news

पेंग्विन मृत्यूच्या चौकशीचे आदेश

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – भायखळा येथील वीरमाता जीजाबाई भोसले उद्यानातील पेंग्विनच्या मृत्यूप्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश लोकायुक्तांनी दिले होते. त्यानुसार पालिका आयुक्त अजय मेहता यांनी चौकशीचे आदेश बुधवारी दिले.

पेंग्विनच्या मृत्यूप्रकरणी लोकायुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन लोकायुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार हे चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबतच्या चौकशीचा अहवाल २६ नोव्हेंबरपर्यंत पालिका आयुक्तांसमोर सादर करण्यात आला आहेत. २९ नोव्हेंबरला हा अहवाल लोकायुक्तांसमोर सादर झाल्यानंतर पालिकेतील विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर पुन्हा सुनावणी होणार आहे.

Check Also

aawaz-news-image

‘पोलिसांची भीती मनातून काढून टाका’

आवाज न्यूज नेटवर्क – जळगाव – कायदा वा नियम हे समाजाच्या भल्यासाठीच असून, त्यांचे जो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *