facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / Featured / ‘आरसी’ छपाईसाठी ‘झीरो पेंडन्सी’

‘आरसी’ छपाईसाठी ‘झीरो पेंडन्सी’

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या वाहन नोंदणी प्रमाणपत्राच्या (आरसी) छपाईसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ‘झीरो पेंडन्सी’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. आरटीओच्या ३५ कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले असून, शनिवारी आणि रविवारी पन्नास हजार ‘आरसी’ छपाईचे ध्येय ठेवण्यात आले आहे. त्याबरोबरच येत्या १५ दिवसांत अतिरिक्त काम करून उर्वरित ‘आरसी’ छपाईचे काम पूर्ण केले जाणार आहे. आजअखेरपर्यंत एक लाखापेक्षा अधिक ‘आरसी’ प्रलंबित आहेत.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नवीन वाहनांची नोंदणी केल्यानंतर, तसेच जुन्या वाहनांची मालकी हस्तांतर केल्यानंतर ‘आरसी’ दिले जाते. स्मार्ट कार्ड स्वरूपातील ‘आरसी’ डिसेंबर २०१४ ला बंद झाले. त्यानंतर ‘आरसी’ कागदावर छपाई करून देण्यास सुरुवात झाली. गेल्या सात महिन्यांपासून हा कागद आरटीओ कार्यलयांना पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने ‘आरटीओ’कडून ‘आरसी’ वितरणास विलंब झाला. परिणामी, नागरिकांना ‘आरसी’साठी आरटीओ आणि पोस्ट ऑफिसचे हेलपाटे मारावे लागत होते. अद्याप एक लाख आरसी बुकची छपाई प्रलंबित आहे. आरसी बुकची छपाई होत नसल्याने वाहनधारकांनाही अनेक महिने आरसीसाठी वाट पहावी लागत आहे. ‘आरटीओ’ अधिकारी बाबसाहेब आजरी यांनी पुणे विभागातील प्रलंबित ‘आरसी’ छपाईच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी ‘झीरो पेंडन्सी’ची योजना आखली.

‘आरसी’साठी लागणाऱ्या कागदाचा आरटीओला पुरवठा होत नव्हता. परिणामी, ‘आरसी’ची छपाई प्रलंबित राहिली. आजरी यांच्या आधीच्या अधिकाऱ्यांनी ‘आरसी’चा कागद मिळविण्यासाठी प्रयत्न केले होते. आता त्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या पंधरा दिवसांत प्रलंबित आरसी बुकची छपाई करून ‘आरसी’बाबत ‘झीरो पेंडन्सी’ करण्याचा आजरी यांचा निर्धार आहे.

दररोज अठरा हजार बुकची छपाई

‘आरसी’ छपाईसाठी नागपूर येथून एक लाख प्रिंट मागविण्यात आले. त्यापैकी ६० प्रिंट पुणे आरटीओसाठी उपलब्ध झाले आहेत. तर, उर्वरीत ४० हजार प्रिंट पिंपरी-चिंचवड व बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना देण्यात आला आहे. ‘आरटीओ’त १८ प्रिंटर आहेत. त्याद्वारे दररोज १७ ते १८ हजार ‘आरसी’ छपाईचे काम पूर्ण करण्याचे आरटीओ प्रशासनाचे ध्येय आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *