facebook
Saturday , February 25 2017
Breaking News
Home / Featured / क्युबाचे माजी अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांचं निधन

क्युबाचे माजी अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांचं निधन

आवाज न्यूज नेटवर्क –

क्युबाचे माजी अध्यक्ष व कम्युनिस्ट क्रांतीचे नेते फिडेल कॅस्ट्रो यांचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. क्युबाच्या राष्ट्रीय वृत्तवाहिनीनं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

कडवा कम्युनिस्ट क्रांतिकारक चे गव्हेरा याच्या साथीनं फिडेल यांनी १९५९ साली क्युबात सत्तांतर घडवून आणले होते. जगभरात चर्चिल्या गेलेल्या या क्रांतीनंतर तब्बल अर्धशतकाहून अधिक काळ फिडेल यांनी क्युबावर अधिराज्य गाजवले. २००८ साली प्रकृतीच्या कारणास्तव आपले धाकटे बंधू राउल कॅस्ट्रो यांच्याकडं क्युबाची धुरा सोपवली होती. वयोमानामुळं उत्तरोत्तर त्यांची प्रकृती खालावत चालली होती. अखेर शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी त्यांच्या मृत्यूची घोषणा करण्यात आली.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *