facebook
Saturday , February 25 2017
Breaking News
Home / Featured / जामखेडमधील जवान शहीद

जामखेडमधील जवान शहीद

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – पठाणकोट येथे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेले जवान नितीन दगडू जगताप अखेर शहीद झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले. अनेक दिवसांपासून ते सतत आजारी पडत होते. त्यांच्यावर लेहेनेवाडी या गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. नितीन जगताप यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.

पठाणकोट येथे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जवान नितीन जगताप जखमी झाले होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली होती; मात्र, पुन्हा ते काही महिन्यांपासून आजारी पडले होते. त्यामुळे त्यांना पुणे येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना तातडीने दिल्ली येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती खालावल्याने गुरुवारी (२४ नोव्हेंबर) सकाळी त्यांचे निधन झाले. जगताप यांच्या निधनामुळे तालुक्यात शोककळा पसरली आहे.

जवान नितीन जगताप हे अकरा वर्षांपूर्वी म्हणजे २००५ मध्ये सैन्यात भरती झाले होते. ते बिहार रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. त्यांनी अकरा वर्षांच्या काळात जम्मू आणि काश्मीर, सियाचीन, हिमाचल प्रदेश, आसाम या भागात अकरा वर्षे देशाची सेवा केली होती. त्यांचे पार्थिव लेहेनेवाडी (ता. जामखेड) येथे शुक्रवारी सकाळी सात वाजता आणण्यात आला. या नंतर ११.३० वाजता शासकीय इतमामात त्यांच्या शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी हवेत फैरी झाडून जवानांनी सलामी दिली. या वेळी जलसंधारणमंत्री, राजशिष्टाचारमंत्री राम शिंदे, सुभेदार भगतसिंग, नायब सुभेदार कुलदीप सिंग, हेमंत साळवे, विजयपाल, भाजप नेते सतीष शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, नगराध्यक्ष विकास राळेभात, सरपंच अजय काशीद, मकरंद काशीद, गटनेते महेश निमोणकर, पोलिस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, तहसीलदार सुशील बेल्हेकर, गुलाब जांभळे, गुलशन अंधारे, माजी सैनिक डुचे आदींसह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अनिल कवडे, पोलिस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी दुपारी लेहेनेवाडी येथे भेट देऊन जगताप कुटुंबीयांचे सांत्वन केले.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *