facebook
Monday , February 27 2017
Breaking News
Home / Featured / धारातीर्थी अधिकारी, जखमी नागरिक अन‍् धावपळ

धारातीर्थी अधिकारी, जखमी नागरिक अन‍् धावपळ

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद – ‘महत्त्वाची बैठक आटोपून मी मुंबईहून औरंगाबादकडे निघालो. छत्रपती शिवाजी टर्मिनसवर सगळीकडे पोलिसच पोलिस. तिथून जेजे हॉस्पिटलला गेलो. दहशतवाद्यांशी लढताना धारातीर्थी पडलेले पोलिस अधिकारी, जखमी झालेले नागरिक त्यांच्यासाठी होणारी धावपळ आणि त्यात मी नोंदविलेला खारीचा वाटा. हे सगळे आजही डोळ्यासमोरून हलत नाही. अख्खा देश चिंतेत होता. माझ्या कुटुंबीयांची परिस्थिती तर अगदीच विचित्र झाली होती. २६ नोव्हेंबरची ती काळरात्र आजही डोळ्यासमोर जात नाही,’ डॉ. पी. आर. गाडे सांगत होते.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशतवादी हल्लाचे ते साक्षीदार आठवर्षांनंतरही आठवणी ताज्या असल्याचे त्यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले. त्यावेळी ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या फार्माकॉलॉजी विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. मुंबईत एका बैठकीसाठी ते गेले होते. रात्री औरंगाबादकडे परतण्यासाठी सीएसटीवर आले आणि त्याचवेळी दहशतवादी हल्ला झाला. यासंदर्भात अधिक सांगताना डॉ. गाडे म्हणाले,‘स्टेशनमध्ये जाण्याआधीच आम्हाला अडविले गेले. काहीतरी अघटित घडल्याची कल्पना आली. सगळीकडे नुसते पोलिस दिसत होते. रेल्वेस्टेशनमध्ये गोळीबार सुरू असल्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. आम्हाला हटविल्यानंतर मी जेजे हॉस्पिटलमध्ये पोचलो. तिथे औरंगाबादचे माने नावाचे फार्मासिस्ट होते. त्यांना इर्मजन्सी ड्यूटीवर बोलाविले होते. मी त्यांच्या खोलीवर थांबलो, पण जेव्हा परिस्थिती गंभीर असल्याचे कळाले आणि आपल्याकडून जी मदत करता येईल ती करावी म्हणून तिथे पोचलो. जे.जे.मधील परिस्थिती फारच वाईट होती. मृतदेह आणले जात होतो. जखमींचा आक्रोश सुरू होता. त्यांना आम्ही औषधोपचार केले. काही झाले तरी दहशतवादी मारलेच पाहिजे असे सर्व जण सांगत होते. काही वेळाने एक मृतदेह आला आणि तो पाहताच आम्हाला सगळ्यांनाच गलबलून आले. पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांचा तो मृतदेह होता. हा प्रसंग आमच्यासाठी अत्यंत दुःखी होता.’

कानात आजही घुमतात बंदुकीचे आवाज
२६ डिसेंबर २००८ रोजी कृषी अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ अर्थमंत्र्यांना भेटायला मुंबईत गेले होते. त्यात उपविभागीय कृषी अधिकारी उदय देवळाणकरही होते. मुंबईत दोन-तीन दिवस थांबावे लागेल म्हणून त्यांनी आणि त्यांचे सहकारी दिलीप जाधव, पालीमकर यांनी छत्रपती शिवजी टर्मिनस येथे पहिल्या मजल्यावरील रेस्ट हाउस बुक केले होते. काम लवकर संपले. एका विमान कंपनीची ८०० रुपयांत औरंगाबादप्रवास ही ऑफर होती म्हणून देवळाणकर विमानाने परतले. त्यापूर्वी सांताक्रूज येथे एका रेस्टॉरंटमध्ये त्यांनी जेवण केले. अडीच तासांनंतर त्याच परिसरात स्फोट झाला. रात्री औरंगाबादेत परतल्यानंतर टीव्ही पाहताना मुंबईतील हल्ल्याची माहिती समजली. त्यांनी लगेचच जाधव आणि पालीमकर यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला. खाली गोळीबार सुरू आहे, पण हा दहशतवादी हल्ला असल्याची माहिती त्यांना नव्हती. देवळाणकरांनी त्यांना ही माहिती दिली त्यावेळी जोरदार गोळीबार सुरू होता. ‘आजही त्या गोळीबाराचा आवाज माझ्या कानात आहे,’ असे ते सांगतात. ‘हल्ल्याची माहिती सांगितल्यानंतर पालीमकर आणि जाधव यांनी मोबाइल बंद केले. दोघांनीही स्वतःला स्वच्छतागृहात कोंडून घेतले. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ते दोघेही तेथेच होते. त्यांच्याशी संपर्कच होत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांना टेन्शन आले होते,’ अशी आठवण देवळाणकर सांगतात.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *