facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / नगरमधील मंदिरांचे होणार फेरसर्वेक्षण

नगरमधील मंदिरांचे होणार फेरसर्वेक्षण

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – नगर शहरातील २४ अनधिकृत ठरवण्यात आलेल्या मंदिरांचे येत्या सोमवारी (२८ नोव्हेंबर) फेरसर्वेक्षण करण्यात येणार आहे. मनपावर शुक्रवारी लोकप्रतिनिधींनी व भाविकांनी काढलेल्या मोर्चानंतर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, फेरसर्वेक्षणानंतर २९ नोव्हेंबरला अंतिम सुनावणी करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

शहरातील नोटिसा दिलेल्या मंदिराबाबत निर्णय घेण्यासाठी आमदार संग्राम जगताप, महापौर सुरेखा कदम, स्थायी समिती सभापती सचिन जाधव व अन्य पदाधिकाऱ्यांची बैठक आयुक्त दिलीप गावडे यांच्या उपस्थितीमध्ये झाली. या बैठकीत २८ नोव्हेंबर रोजी मनपाचे अधिकारी पुन्हा एकदा संबंधित २४ मंदिरांचे फेरसर्वेक्षण करून अहवाल सादर करणार असल्याचे सांगण्यात आले. यासाठी स्वतंत्र चार पथके नियुक्त करण्यात येणार असून, प्रत्येक पथकाचे सदस्य हे मंदिराची तपासणी केल्यानंतर तेथील लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक व ज्येष्ठ नागरिक यांच्याशी चर्चा करतील. स्थानिक नागरिक संबंधित मंदिर हे २९ सप्टेंबर २००९ च्या पूर्वीचे असल्याचे जे-जे पुरावे सादर करतील, त्या सर्व पुराव्यांच्या आधारे मंदिराचा अहवाल तयार केला जाणार आहे. त्यानंतर २९ नोव्हेंबर रोजी नागरिकांनी सादर केलेले पुरावे हे कायदेशीर आहेत का, याची तपासणी करून अंतिम सुनावणी करण्यात येईल व त्यानंतर मंदिरांबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही या बैठकीत ठरविण्यात आले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *