facebook
Sunday , April 23 2017
Breaking News
Home / Featured / प्रभाग रचना अखेर जैसे थे

प्रभाग रचना अखेर जैसे थे

आवाज न्यूज नेटवर्क –

नाशिक – महापालिकेच्या प्रभाग रचनेवर दाखल झालेल्या ३२ पैकी ३० हरकती राज्य निवडणूक आयोगाने फेटाळल्या आहेत. केवळ प्रभाग क्रमांक २० व २७ संदर्भातील हरकतींमुळे त्यात तांत्रिक बदल करण्यात आले असून, मुद्रणातील काही दोष दूर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

प्रभाग रचनेतील सीमारेषा, लोकसंख्या, आरक्षणांसदर्भातील सर्व हरकती फेटाळल्याने महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध केल्यानंतर ती राजपत्रासह महापालिकेच्या वेबसाईट प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे अनेकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांवर पाणी फेरले गेले आहे.

महापालिकेच्या प्रभाग रचनेवर एकूण ३२ हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. या हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी दीपक कपूर यांची नियुक्ती केली होती. सर्वाधिक तक्रारी या प्रभागांच्या तोडफोडी, लोकसंख्येच्या होत्या. त्यामध्ये शिवसेनेचे माजी सभागृहनेते भगवान भोगे यांनी संपूर्ण प्रभाग रचनेवर आक्षेप घेतला होता.

कपूर यांनी हरकतींवर सुनावणी घेत अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला होता. राज्य निवडणूक आयोगाने कपूर यांच्या अहवालानंतर शुक्रवारी अंतिम प्रभारचना प्रसिद्ध केले असून, ३२ पैकी ३० हरकती फेटाळल्या. प्रभाग क्रमांक २० मध्ये नितीन चिडे यांनी घेतलेल्या हरकतीची दखल घेत, प्रभागाचे विस्तृत वर्णन देण्याच्या सूचना कपूर यांनी केल्या. प्रभाग २७ मध्ये बदल करण्यात आला.

कोर्टात जाण्याचा पर्याय

भगवान भोगे यांनी पूर्ण प्रभाग रचनेवर आक्षेप घेतला होता. आता त्यांच्यासह सर्वांच्याच हरकती फेटाळण्यात आल्याने त्यांच्याकडे कोर्टात जाण्याचा शेवटचा मार्ग शिल्लक आहे. त्यामुळे भोगेंसह अन्य हरकतदार काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून आहे.

भाजपला दिलासा

महापालिकेची प्रभागरचना भाजपच्या प्रभावाखाली तयार केल्याचा आरोप शिवसेनेसह अन्य पक्षांनी केला होता. भोगे यांनी तर निवडणूक आयोगाकडे थेट तक्रार दाखल करीत, काही अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली होती. आमदार बाळासाहेब सानप, माजी आमदार वसंत गिते यांच्यासह महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर हस्तक्षेप केल्याचा आरोप केला होता. परंतु, राज्य निवडणूक आयोगाने या सर्व हरकती फेटाळून लावल्याने भाजपसह पदाधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *