facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / ‘मरे’, हार्बरवर मेगाब्लॉक

‘मरे’, हार्बरवर मेगाब्लॉक

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – मुंबईच्या दोन्ही रेल्वे मार्गांवर देखभाल आणि दुरुस्तीसाठी येत्या रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेन लाइनच्या डाऊन जलद मार्गावर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान, हार्बर मार्गावर नेरुळ ते मानखुर्द स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेवर नाइटब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुख्य मार्ग – माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर स. १०.१५ ते दु. ३.१५ वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. या काळात मांटुगा ते मुलुंड मार्गावरील डाऊन जलद मार्गावरील वाहतूक स. ९.३८ ते दु. २.५४ वाजेपर्यंत डाऊउन धीम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहे. अप जलद मार्गावरील लोकल स. १०.४६ ते दु. ३.१८ दरम्यान मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकात थांबतील.

हार्बर मार्ग – नेरुळ ते मानखुर्ददरम्यान अप आणि डाऊन मार्गावर स. ११.१० ते दु. ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक आहे. या काळात नेरुळ ते मानखुर्द दरम्यानची अप व डाऊन मार्गावरील वाहतूक स. १०.११ ते दु. ३.४६ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद असणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी ते मानखुर्द आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते पनवेल जादा गाड्या चालविण्यात येतील. हार्बर वरील प्रवासी स. ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यत मेन लाइन आणि ट्रान्स हार्बर मार्गाने प्रवास करू शकतील.

‘परे’चा नाईटब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली ते भाईंदरदरम्यान शनिवार, २६ नोव्हेंबरला रात्री १२.५० ते पहाटे ४.५० वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. या काळात अप धीम्या मार्गावरील सर्व लोकल बोरीवली ते वसई रोड-विरारदरम्यान अप जलद मार्गावरुन चालविण्यात येतील.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *