facebook
Sunday , April 30 2017
Breaking News
Home / Featured / रेल्वे रुळाला तडे, मुंबई लोकल विस्कळीत

रेल्वे रुळाला तडे, मुंबई लोकल विस्कळीत

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – मध्य रेल्वेच्या टिटवाळा स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने टिटवाळ्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक गेल्या दोन तासांपासून कोलमडली आहे. कामावर जाण्याच्या वेळीच हा प्रकार घडल्यामुळं प्रवाशांची अक्षरश: तारांबळ उडाली आहे. दुसरीकडं, कोपरखैरणे व घणसोली दरम्यानच्या रुळाला तडे गेल्यानं ट्रान्सहार्बर मार्गावरील वाहतुकीचाही खोळंबा झाला आहे.

कोपरखैरणे आणि घणसोली दरम्यान रेल्वेरुळाला तडे गेल्याचे लक्षात येताच वाशीहून ठाण्याला येणाऱ्या लोकल थांबविण्यात आल्या. त्यामुळं कामावर जाण्यासाठी प्लॅटफार्मवर थांबलेल्या प्रवाशांची मध्येच लटकले. लोकल पूर्णपणे ठप्प झाल्याने वाशी ते ठाणे दरम्यानच्या सर्व स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. तब्बल तासाभराच्या प्रतीक्षेनंतर वाहतूक सुरू झाल्याचं समजतं. मात्र, तोवर प्रचंड गर्दी झाल्यानं चाकरमान्यांना धक्केबुक्के खातच प्रवास करावा लागला.

ट्रान्सहार्बरची लोकल सेवा ठप्प झाल्यामुळे ठाण्यावरून कुर्लामार्गे वाशीला जाण्याच्या बेतात असलेल्या प्रवाशांना मध्य रेल्वेनंही दगा दिला. टिटवाळा स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूकही ठप्प झाली. त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहिर अशा कोंडीत सापडलेल्या प्रवाशांना बस, रिक्शा आणि टॅक्सीचा आधार घ्यावा लागला. ही वाहतूक दोन तासांनंतरही विस्कळीतच आहे. प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेने विशेष बससेवा सुरू केली होती.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *