facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / Featured / सिन्नरमध्ये रात्र वैऱ्याची

सिन्नरमध्ये रात्र वैऱ्याची

आवाज न्यूज नेटवर्क –

नाशिक – सिन्नर नगरपालिका निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसह अपक्षांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यांत झालेल्या सभामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झाडल्या. नंतर मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर देण्यात आला. एक, एका मतदाराला पुन्हा पुन्हा भेटून निवडणुकीतील प्रचार शिगेला पोहोचवला आहे.

भाजपचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी आपली शक्ती पणाला लावली असून, नगरपालिकेवर पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी आखलेले डावपेच परतवून लावण्यासाठी शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे यांनीही आपली ताकद पणाला लावली आहे. पालिकेत बोकाळलेला भ्रष्टाचार थांबवण्यासाठी परिवर्तन करण्याचे आवाहन केले आहे. कोकाटे यांनी मुख्यमंत्र्याची सभा घेवून प्रचारात आघाडी घेतली असताना वाजे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ खडसे, ग्रामविकास राज्य मंत्री दादा भुसे, आमदार अनिल कदम यांच्या सभा घेवून निवडणुकीत मोठी रंगत आणली. त्याचप्रमाणे काँग्रेस आघाडीने आमदार जितेंद्र आव्हाड यांची सभा घेऊन सिन्नरचा विकास काँग्रेसच्या काळात झाल्याचा प्रचारातील मुद्दा घेत मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला. मनसेचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार राजेंद्र बोरसे व इतर उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेऊन आम्हीही रिंगणात असल्याचे स्पष्ट केले. सिन्नरच्या राजकारणात सभेत पोलखोल करण्याऱ्यांमध्ये प्रसिद्ध असलेले वयोवृद्ध नेते अॅड. झुंजार आव्हाड यांनी नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार वसंत बाबा नाईक यांच्या प्रचारार्थ सभा घेवून सर्वच नेत्याच्या चांगलीच खिल्लह उडवली.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *