facebook
Sunday , December 4 2016
Home / Featured / दुकानांमधून मिनी बँक‌िंग सेवा
aawaz-news-image

दुकानांमधून मिनी बँक‌िंग सेवा

आवाज न्यूज नेटवर्क –

नाशिक – आता खेड्यापाड्यातही मिनी बँकिंगची सुविधा उपलब्ध होणार असून, छोट्या-मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी ग्रामस्थांना तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी धाव घेण्याची गरज भासणार नाही. त्या त्या भागातील रेशन दुकाने मिनी बँक म्हणून कार्यान्वित करण्याची योजना अन्न व पुरवठा विभाग, तसेच काही बँकांनी संयुक्तरित्या हाती घेतली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात नाशिक विभागातील धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगरसह नाशिक या पाच जिल्ह्यांच्या पुरवठा विभागाची बैठक पार पडली. यावेळी पुरवठा विभागाचे उपायुक्त रघुनाथ गावडे, नाशिकच्या जिल्हा पुरवठा अधिकारी सरिता नरके, अन्य जिल्ह्यांचे पुरवठा अधिकारी, तसेच एस बँकेचे व्यवस्थापक केदार देशपांडे, सचिन डहाळे, आयडीएफसी बँकेचे सचिन पेडेकर, रुपेचे अनुराग मिश्रा, अॅक्सिस बँकेचे सुदीप मुळे आदी उपस्थित होते.

सरकारच्या बदलत्या धोरणांमुळे माफक दरात अन्नधान्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे रेशन दुकानदारांनाच मिनी बँक म्हणून उत्पन्नाचे अन्य पर्याय उपलब्ध करून द्यावेत आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या गावातच बँक‌िंगसंदर्भातील आर्थिक व्यवहार करता यावेत, या उद्देशाने रेशन दुकानदार बँकांचे बिझनेस करस्पॉडंट म्हणून काम करणार आहेत. त्यामुळे रेशनव्यवस्था सशक्त होईल, असा विश्वास पुरवठा विभागाचे उपसचिव बी. बी. पाटील यांनी व्यक्त केला.

लाभार्थीलाच रेशन

लाभार्थीच्या रेशन कार्डवर अन्य व्यक्ती अन्नधान्य खरेदी करीत असल्याचे प्रकार सर्रास घडतात. असे प्रकार रोखण्यासाठीे ‘पॉइंट ऑफ सेल’ उपकरण बसविण्याचा निर्णय अन्न व पुरवठा विभागाने घेतला आहे. तसेच भ्रष्टाचार रोखण्यासाठी पीओएस व्यवस्थाच ‘आधार’शी जोडून ती बायोमेट्रिक केली जाणार आहे. लाभार्थ्यांचे आधार क्रमांक संलग्नित केले असून, बायोमेट्र‌िक पद्धतीने ओळख पटवून शिधावस्तूंचे वाटप केले जाईल. राज्यातील ५१ हजार ७२५ रास्तभाव दुकानांमध्ये हे उपकरण बसविण्यात येईल. संबंधित कार्डधारक, तसेच कार्डवर नावे असलेल्या तीन व्यक्तींची या पीओएसवर नोंद असेल. त्यापैकी कुणीही व्यक्ती धान्य खरेदी करून आणू शकेल.

ही कामे करू शकणार
बँकांच्या लहान ठेवी गोळा करणे, बँकांच्या लहान ठेवी गोळा करणे, ग्राहकांच्या पॉल‌िसी काढून देणे, बँकांची थकीत वसुली तसेच बँक लोनचे हप्ते भरून घेणे, बचतगटांना बँकांमार्फत अर्थसहाय्य पुरविणे, पेन्शन काढून देणे, मोबाइल, टीव्ही रिचार्ज करणे

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *