facebook
Sunday , December 11 2016
Home / Featured / पोलिसांकडून पुन्हा एक कोटी रुपये जप्त
news-6

पोलिसांकडून पुन्हा एक कोटी रुपये जप्त

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – दोनच दिवसांपूर्वी जुन्या नोटांच्या स्वरूपातील एक कोटी रुपये जप्त केल्याची घटना ताजी असतानाच लष्कर पोलिसांनी गुरुवारी एक कोटी १२ लाख रुपये जप्त केले. जप्त रकमेमध्ये पाचशे रुपयांच्या २२, ४४४ तर एक हजार रुपयांच्या २८ नोटांचा समावेश आहे. जप्त नोटा प्राप्तिकर विभागाच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. हा काळा पैसा कायदेशीर करण्यासाठी २५ टक्के कमिशनचा व्यवहार सुरू असताना पोलिसांनी ही कारवाई केली.
भरत राजमल शहा (रा. शंकरशेट रोड) या व्यावसायिकाकडून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. शहा यांना गुरुवारी रात्री पोलिसांनी नोटीस बजावून सोडून दिले. त्यांना शुक्रवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, अशी माहिती पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली. लष्कर पोलिस ठाण्याचे कर्मचारी शंकर लोंढे यांना शहा सुमारे एक कोटी रुपये घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत कुंवर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून शहा यांना ताब्यात घेतले. शहा यांच्या कारमधील कापडी पिशव्यांमध्ये एक कोटींची रोकड होती. शहा यांचा गंज पेठेत बांधकाम साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. महात्मा गांधी रस्त्यावर कॅनरा बँकेच्या समोर गुरुवारी रात्रीसाडे नऊच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांना शहा यांच्याकडे ५०० रुपयांच्या २२, ४४४ नोटा, तर एक हजार रुपयांच्या २८ नोटा मिळाल्या. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत या नोटा २५ टक्के मोबदला घेऊन देऊन नवीन चलनात बदलून मिळणार होत्या. पोलिसांनी या नोटांबद्दलची माहिती प्राप्तिकर विभागातील अधिकारी के. के. मिश्रा यांना दिली आहे, असे डहाणे म्हणाले. सहायक आयुक्त नीलेश मोरे, वरिष्ठ निरीक्षक वसंत कुंवर, वैशाली चांदगुडे यांच्या पथकातील सहायक निरीक्षक अमित घुले, पोलीस कर्मचारी शंकर लोंढे, गण्पत थिकोळे, निरंजन जाधव, अमोल राऊत, पवण भोसले, ए. एन. पठाण, आबासाहेब धावडे यांनी ही कारवाई केली.

Check Also

news-4

आजपासून एसटीत जुन्या नोटा बंद

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – एसटी प्रवासात प्रवाशांकडून जुन्या पाचशेच्या नोटा स्वीकारणे बंद करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *