facebook
Sunday , December 11 2016
Home / Featured / बँक खाते उघडण्याची शेतमजूर, महिलांना सुविधा
aawaz-news-image

बँक खाते उघडण्याची शेतमजूर, महिलांना सुविधा

आवाज न्यूज नेटवर्क –

जळगाव – ग्रामीण भागातील सामान्य शेतकरी, शेतमजूर, घरकाम करणाऱ्या महिला, गृहिणी कामगार वर्गातील ज्या लोकांकडे बँकखाते नाही अशा सर्व लोकांना शनिवार (दि. २६) पासून जिल्हाभरात मंडळस्तरावर खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचठिकाणी मंगळवारपासून खातेदारांना पैसे काढण्याची सुविधादेखील मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी दिली.

जिल्ह्यातील ८६ मंडळ असलेल्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात त्याचप्रमाणे पंधरा तहसील कार्यालये, ७ उपविभागीय कार्यालये व जिल्हाधिकारी कार्यालयात अशा २३ ठिकाणी बँक मित्र उपस्थित राहतील. म्हणजेच जिल्हाभरात १०९ ठिकाणी ही सुविधा उपलब्ध होईल. याठिकाणी खाते उघडण्यासाठी संबंधितांनी आपले कोणतेही एक फोटो ओळखपत्र व दोन पासपोर्ट आकाराचे फोटो घेऊन यावे. शनिवार, रविवार व सोमवारी खाते उघडता येतील. मंगळवारपासून ८६ मंडळ ठिकाणी प्रत्येकी दोन बँक मित्र, तर तहसील, उपविभागीय कार्यालये व जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रत्येकी ५ बँक मित्र उपस्थित असतील, अशाप्रकारे एकूण २८७ ठिकाणी ही सुविधा उपलब्ध होईल. याच केंद्रांवर खाते उघडण्यासोबतच बँक खातेधारकांच्या खात्यातील पैसे काढण्याची सुविधाही उपलब्ध होईल. याठिकाणी दोन हजार रुपयांची रोकड खातेदारांना आपल्या खात्यावरून काढता येणार आहे. त्यासाठी फक्त आधारकार्ड आणावे लागणार आहे.

Check Also

news-4

आजपासून एसटीत जुन्या नोटा बंद

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – एसटी प्रवासात प्रवाशांकडून जुन्या पाचशेच्या नोटा स्वीकारणे बंद करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *