facebook
Saturday , December 3 2016
Home / Featured / सांडपाण्यासाठी द्या दहा टक्के जागा
news-12

सांडपाण्यासाठी द्या दहा टक्के जागा

आवाज न्यूज नेटवर्क –

जळगाव – सरकारने राज्यातील ‘ड’ वर्ग पालिकांसाठी तयार केलेल्या नवीन डीसी रुल्समध्ये मोठ्या ले-आऊटला सांडपाणी निचरा प्रक्रियेसाठी १० टक्के जागा सोडणे अनिवार्य केल्याने विकसकांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे नियमाप्रमाणे जरी १० हजार स्क्वेअर मीटरवरील लेआऊटसाठी हा नियम असला तरी १९६६ नंतर विभागणी केलेल्या (तुकडा पाडलेल्या) ले-आऊटलादेखील तो लागू होणार असल्याने बांधकाम व्यावसायिकांनी या तरतुदीचा धसका घेतला आहे.

शासनाने ‘ड’ पालिकांसाठी केलेली विकास नियमन नियमावली अर्था डीसी रुल्स येत्या सोमवारपासून (दि. २८) लागू करण्यात आली आहे. या नव्या नियमावलीत अनेक तरतुदींचा अर्थदेखील स्पष्ट होत नाही. या नव्या नियमावलीनुसार १० हजार स्क्वेअर फुटांवरील जागेचे ले-आऊट करायचे असेल तर त्यात १० टक्के जागा ही सांडपाणी निचरा प्रक्रियेसाठी सोडावी लागणार आहे.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *