facebook
Friday , February 24 2017
Breaking News
Home / Featured / कर्करोगाच्या पेशी प्रत्येकाच्या शरीरात

कर्करोगाच्या पेशी प्रत्येकाच्या शरीरात

आवाज न्यूज नेटवर्क –

नागपूर – प्रत्येकाच्या शरीरात रोज उलथापालथ घडत असते. दिनचर्या, आहार, सवयी, निद्रा, ताणतणाव या सगळ्यांचे पडसाद शरीरावर उमटत असतात. या उलथापालथीतूनच प्रत्येकाच्या शरीरात अपायकारक पेशी तयार होतात. या पेशींचा वेळीच नायनाट करणे हे श्वेतपेशींचे काम असते. यातले संतुलन बिघडल्यानंतर असाध्य व्याधींचा विळखा वाढत जातो. त्यामुळे अशा व्याधींना दूर ठेवायचे असेल तर स्वतःला शिस्त लावून घ्या, असा सल्ला महाक्रिटिकॉन परिषदेच्या पहिल्या दिवशी तज्ज्ञांनी व्यक्त केला.

असाध्य आजार आणि आकस्मिक आघात या दोन्ही वेळांत अतिदक्षता विभागातील डॉक्टरांची भूमिका कशी बदलते, यावर वैद्यकीय परिभाषेत प्रकाश टाकताना मुंबई येथील टाटा कॅन्सर इन्स्टिट्युटच्या अतिदक्षता विभागाच्या प्रमुख डॉ. विजया पाटील म्हणाल्या, ‘प्रत्येकाच्या शरीरात रोज आमूलाग्र घडामोडी घडत असतात. आपली दिनचर्या, आहार, सवयी, निद्रा या सगळ्यांचे पडसाद शरीरावर आणि अंतर्गत अवयवांवर त्याचे परिणाम होत असतात. श्वास घेणारे शरीर वरवर सक्रिय वाटत असले तरी अनेकवेळा आतून बदल सुरू असतात. पेशींपासून हे शरीर बनले आहे. त्यामुळे चांगल्या पेशींसोबतच अपायकारक पेशीदेखील शरीरात सक्रिय असतात. मात्र, या अपायकारक पेशींना वेळीच आवर घालण्याचे काम श्वेतपेशी करत असतात. शरीराच्या क्रियेत यातल्या एकाही गोष्टीचे संतुलन बिघडले तर श्वेतपेशींच्या क्रियाशीलतेवर परिणाम होतो. त्यामुळे अपायकारक पेशी अधिक आक्रमक होऊन शरीरावर ताबा मिळवितात. कर्करोगाच्या पेशीदेखील यातला प्रकार असतो. त्यामुळे संतुलित आहार, जीवनशैलीसोबतच संतुलित निद्रादेखील शरीराला महत्त्वाची असते.’

हा धागा पकडून कोलकाता येथील इगल्स अपोलो हॉस्पिटलचे डॉ. सुरेश रामसुब्बन म्हणाले, ‘आपल्याकडे जंतुसंसर्ग झाल्याने अतिदक्षता विभागात हलवावे लागणाऱ्या रुग्णांचे प्रमाण विकसीत देशांच्या तुलनेत अधिक आहे. डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड, स्क्रब टायफस यांसारख्या आजारांमुळे होणारा जंतुसंसर्ग प्राणघातक ठरतो. लोकसंख्येची दाट घनता असल्याने देशात सरासरी ३० टक्के रुग्ण अतिदक्षता विभागात येतात. यातले ५२ टक्के रुग्ण हे जंतुसंसर्गाचे असतात. अशावेळी रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढविताना त्याचे हार्मोलन संतुलनही राखणे गरजेचे असते.’

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *