facebook
Monday , February 27 2017
Breaking News
Home / Featured / दोन हजार रुग्ण ‘दृष्टी’च्या प्रतीक्षेत

दोन हजार रुग्ण ‘दृष्टी’च्या प्रतीक्षेत

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – अवयवदानमध्ये विशेषतः नेत्रदानाबाबत गेल्या काही वर्षांमध्ये मोठी जनजागृती होत असली तरी आजही राज्यात तब्बल सव्वा दोन हजारांहून अधिक नेत्रहिन व्यक्ती ‘डोळ्यां’च्या प्रतीक्षेत आहेत. नेत्रादानाबाबत असलेले गैरसमज-अंधश्रध्दा व जनजागृतीचा अभाव यामुळे नेत्रहीन व्यक्तींच्या जीवनातील अंधःकार दूर होण्यास विलंब होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाकडून नेत्रदानाच्या जनजागृतीसाठी वेळोवेळी मोह‌मिा राबवण्यात येतात. या पार्श्वभूमीवर राज्यात नेत्रदानाच्या प्रतीक्षेत असलेल्यांची आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार राज्यात सध्या २ हजार २१८ नेत्रहीन व्यक्ती ‘दृष्टी’ मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये नेत्रपटल मि‍ळण्याच्या प्रतीक्षायादीवर सुमारे १३० रुग्णांची नावे नोंदवली आहेत. पण प्रत्यक्षात गरजू व्यक्तींची संख्या याहून अधिक आहे. आपल्याकडे नेत्रदानाबाबत खूप गैरसमज आहेत. त्यामुळे मरणोत्तर नेत्रदानाचे प्रमाण खूप कमी असल्याचे डॉक्टर सांगतात.

नेत्रहीन व्यक्तींच्या आयुष्यातील अंधःकार दूर करण्यासाठी नेत्रदानाचे प्रमाण वाढण्याची गरज आहे. नियमित डोळ्यांच्या तपासणीचा अभाव, मोतिबिंदू, काचबिंदू व मधुमेह या तीन प्रमुख कारणांमुळे अकाली अंधत्व येण्याचा धोका असतो. त्याशिवाय फटाके किंवा डोळ्याला गंभीर स्वरुपाची इजा झाल्यास अंधत्वाचा धोका असतो.

आनंदवनात ‘नवी दृष्टी’

कष्टकरी, शेतकरी, आदिवासी बांधवांसाठी वरोरा येथील ‘आनंदवन’मध्ये आयोजित केलेल्या नेत्रचिकित्सा शिबिरात गेल्या दोन दिवसांत जवळजवळ सहाशे जणांना नवी दृष्टी देण्याचे काम जे.जे. रुग्णालयाच्या नेत्रविभागातील डॉक्टरांच्या टीमने केले आहे. या विभागाच्या वती‌ने दरवर्षी ‘आनंदवन’मध्ये अशी शिबिरे आयोजित केली जातात. यंदाचे हे सतरावे ‌शिबीर आहे. चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, यवतमाळ या चार प्रमुख जिल्ह्यांतून प्रामुख्याने कष्टकरी शेतकरी आदिवासी नेत्रतपासणीसाठी आली असून, गेल्या चार दिवसांत सुमारे १२ हजार लोकांच्या डोळ्यांची तपासणी झाली, अशी माहिती जे. जे. रुग्णालयाचे डीन व नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने व नेत्रविभाग प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांनी दिली. यावेळी विकास आमटेही उपस्थ‌ति होते.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *