facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / नगरपरिषदा-नगरपंचायतींसाठी आज मतदान

नगरपरिषदा-नगरपंचायतींसाठी आज मतदान

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर – सांगली जिल्ह्यातील पाच नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायत निवडणुकीसाठी आज, रविवारी मतदान होत आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. एकूण १ लाख ८७ हजार १०६ मतदार असून, ते २६४ मतदान केंद्रांवर मतदान करतील. या केंद्रांवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी शनिवारी दिली.

सांगली जिल्ह्यात इस्लामपूर, विटा, आष्टा, तासगाव व पलूस नगरपरिषद तसेच कवठेमहांकाळ, कडेगाव आणि खानापूर नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्यासाठी प्रत्येक नगरपरिषद व नगरपंचायतनिहाय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये इस्लामपूरसाठी ८४ अधिकारी, ३६९ कर्मचारी, विट्यासाठी १५ अधिकारी, ३७३ कर्मचारी, आष्ट्यासाठी ७ अधिकारी, ४३५ कर्मचारी, तासगावसाठी ७ अधिकारी, ३४५ कर्मचारी, पलूससाठी १५ अधिकारी व ३२५ कर्मचारी. कवठेमहांकाळसाठी १५ अधिकारी, २६१ कर्मचारी, खानापूरसाठी ३ अधिकारी, १०० कर्मचारी व कडेगावसाठी २२ अधिकारी व १३२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी एकूण ६ पोलिस उपाअधीक्षक १७ पोलिस निरीक्षक, ७१ सहायक पोलिस निरीक्षक, १ हजार १९६ पोलिस कर्मचारी, ८०० होमगार्ड, एसआरपीएफची १ कंपनी याबरोबरच १०६ वायरलेस तसेच ९९ वाहने, असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रत्येक नगरपालिकेसाठी प्रभारी अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. २८ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

इस्लामपूर, विटा, कडेगावात सर्वाधिक चुरस

नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक चुरस इस्लामपूर, विटा या ठिकाणी आणि कडेगाव नगरपंचायतीमध्ये आहे. इस्लामपूरची निवडणूक माजी मंत्री, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यांना सर्वपक्षीय आघाडीशी सामना करावा लागत आहे. विटा येथे शिवसेनेचे विद्यमान आमदार अनिल बाबर आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्यात थेट सामना होत आहे. दोन्ही नेत्यांच्या सुनबाई थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमने-सामने आल्या आहेत. कडेगाव नगरपंचायतीची पहिली निवडणूक आहे. या ठिकाणी पारंपरिक विरोधक माजी मंत्री, ज्येष्ठ नेते पतंगराव कदम आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यात आहे. तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत खासदार संजय पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *