facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / नोटाबंदीवर अनोखी श्रद्धांजली

नोटाबंदीवर अनोखी श्रद्धांजली

आवाज न्यूज नेटवर्क –

नाशिक – देशभरात नोटबंदीमुळे सुमारे ६० ते ७० जणांचा मृत्यू झाला. नोटाबंदीमुळे एकीकडे निष्पाप नागरिकांचा बळी पडत असताना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने या बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांकडे काणाडोळा केला आहे. त्यामुळे अशा निष्पाप नागरिकांना शनिवारी (दि. २६) सीबीएस येथील हुतात्मा स्मारक येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी श्रद्धांजली वाहून भाजप व मोदींचा अनोखा निषेध केला.

देशात ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद झाल्याच्या निर्णयामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबध असणारे सुमारे ६० ते ७० लोक देशभरात आजपर्यंत मृत्यूमुखी पडले आहे. यात काहीजण लांब रांगेत तासनतास उभे राहून दमल्यामुळे मृत्यूमुखी पडले, तर काहींना हृदयविकाराचा झटका आला. राज्यातील नांदेडमधील दिगंबर कसबे, शहादा येथील सिकंदर पठाण, भाईंदर येथील दीपकभाई शहा यांचा बँकेतील रांगेत उभे राहून हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. तर शेतकरी पहिलेच नापिकीमुळे आत्महत्या करीत असताना आता या नोटबंदीमुळे त्यांच्यावरही मरणाची वेळ आली आहे. यात बँकेतील कर्मचारीसुद्धा हृदयविकाराने मृत्यूमुखी पडले आहेत. या सर्वात राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात, नोटबंदीचा त्रास सहन करणे म्हणजे खरी देशभक्ती आहे. परंतु जो व्यक्ती या त्रासाबद्दल बोलेल त्यास तुम्ही देशद्रोहाचा आरोप करून देशद्रोही ठरवाल का, असा सवाल शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केला.

नोटबंदीचा निर्णय हा चांगला आहे यात दुमत नाही. परंतु हा निर्णय घेण्याआधी यासंबंधीच्या उपाययोजना करणे गरजेचे होते. जेणेकरून आज या ६० ते ७० निष्पाप गरीब जनतेचा बळी गेला नसता. त्यामुळे अशी अनोखी श्रद्धांजली वाहून भाजपचा निषेध केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तसेच शनिवारी २६/११ च्या घटनेला ८ वर्ष पूर्ण झाले असून यात हल्ल्यात मरण पावलेल्या शहिदांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

या वेळी चिन्मय गाढे, किरण पानकर, मितेश राठोड, राहुल तुपे, अमोल नाईक, सनी ओबेरॉय, भूषण गायकवाड, रोहित जाधव, जॉनी सोळंकी, अमन रंधवा आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *