facebook
Sunday , April 30 2017
Breaking News
Home / Featured / प्रचार संपला, आज मतदान

प्रचार संपला, आज मतदान

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद – पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील जालना, बीड, उस्मानाबाद, हिंगोली व परभणी या पाच जिल्ह्यातील २८ नगरपरिषदांसाठी २७ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. सर्वत्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना असा बहुरंगी सामना होत आहे. मतमोजणी २८ नोव्हेंबर रोजी होणार असून या निवडणुकीसाठीची जय्यत तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना व औरंगाबाद या आठ जिल्ह्यात एकूण ५० नगरपरिषद नगरपालिका, ४ महानगरपालिका, व २४ नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे कार्यक्रम सध्या सुरू आहेत. या निवडणुकीत सर्वत्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना असा बहुरंगी सामना होत आहे. या निवडणुकींकडे सर्वांचे लक्ष लागले असून गेल्या पंधरा दिवसात सर्वच पक्षातील मातब्बर मंडळीने प्रचारात उतरली होती. पदयात्रा व सभाच्या माध्यमातून सर्वानी प्रचार यंत्रणेवर भर दिला होता.
पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील पाच जिल्ह्यातील २८ नगरपरिषदांसाठी मतदान २७ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी एकूण सात हजार ४५५ बॅलेट युनिट, सात हजार ४०२ कंट्रोल युनिट व चार हजार ३७ मेमरीचीप उपलब्ध आहेत. पहिल्या टप्प्यातील या २८ नगर पारिषदेतील निवडणुकीसाठी ११ लाख ३५ हजार ३९६ मतदार मतदान करणार आहेत.
दुसऱ्या टप्प्यात १४ डिसेंबरला मतदान होणार आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यातील उदगीर, औसा, निलंगा, अहमदपूर येथील नगरपरिषदांचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यात १८ डिसेंबरला मतदान होईल. यामध्ये नांदेड व औरंगाबाद जिल्ह्याचा समावेश आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *