facebook
Monday , February 27 2017
Breaking News
Home / Featured / भांडुपचे बंटी-बबली अखेर अटकेत

भांडुपचे बंटी-बबली अखेर अटकेत

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – भांडुपमध्ये बेरोजगार आणि गरजू पुरुषांना वीर्य विका आणि लाखो रुपये कमवा, असे प्रलोभन दाखवत फसवणाऱ्या बंटी-बबली या जोडीला पोलिसांनी नायगावहून अटक केली आहे. तरबेज खान ऊर्फ सलिम खान आण‌ि रेणुका खान अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांनी आतापर्यंत भांडुपमधील २६ हून अधिक जणांना अशा प्रकारे फसवले होते. गेल्या दोन महिन्यांपासून पोलिस त्याचा शोध घेत होते.

मूळचा केरळचा असलेला तरबेजचे अनेक वर्षांपासून भांडुपच्या टेंभीपाडा येथे राहणा‍ऱ्या रेणुकाशी प्रेमसंबंध होते. मात्र रेणुकाच्या घरातल्यांना ही बाब मान्य नव्हती. त्यामुळे दोघेही प्रतापनगर येथील रेणुकाच्या ओळखीच्या व्यक्तीकडे जानेवारीपासून भाड्याने राहत होते. हे दोघे कुठेही नोकरीला नव्हते. त्यामुळे उदर‌निर्वाहासाठी या दोघांनी बंटी-बबली चित्रपटातील पात्रांप्रमाणे लोकांची फसवणूक करायला सुरुवात केली. ते बेरोजगार आणि गरजूंना झटपट श्रीमंत होण्याचे प्रलोभन दाखवत जाळ्यात ओढत. तसेच घरचा पत्ता आणि ओळख लपवण्यासाठी हे दोघेही विक्रोळी रेल्वे स्थानकाबाहेर सर्वांना भेटण्यासाठी बोलावायचे. जाळ्यात अडकलेल्या सर्व पुरुषांना त्यांचे वीर्य केरळच्या कोचीन येथील लॅबमध्ये संशोधनासाठी दिल्यास महिन्याला ४ लाख ७० हजार रुपये मिळतील असे सांगितले होते. मात्र राहण्याचा आणि जाण्याचा खर्च तुम्हालाच करावा लागेल, असे सांगितले होते. तसेच या पुरुषांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांचे फोटो, पॅनकार्ड आणि आधारकार्डची झेरॉक्सही जमा करून घेतले होते.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *