facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / Featured / माजी नगरसेवकाकडून महिलेस मारहाण

माजी नगरसेवकाकडून महिलेस मारहाण

आवाज न्यूज नेटवर्क –

जळगाव – जागा खाली करण्याच्या कारणावरून माजी नगरसेवक अरूण शिरसाळे यांच्याकडून मारहाण झाल्याची तक्रार एका महिलेने जिल्हा पेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर अरूण शिरसाळे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. माजी नगरसेवक अरूण नारायण शिरसाळे हे राहत असलेल्या घरासमोरील जागा ही त्यांनी भाड्याने खरेदी केली. परंतु त्याठिकाणी शकुंतला राजमल शर्मा यांचे काही संसारोपयोगी साहित्य पडलेले आहे. त्यामुळे जागा भाड्याने घेतले असल्याने जागा खाली करून द्यावी, या विषयावरून शकुंतला शर्मा व अरूण शिरसाळे यांच्यात वाद झाला. यानंतर अरूण शिरसाळे यांच्याकडून महिलेस मारहाण झाली. महिलेने शनिवारी सकाळीच पोलिस स्टेशन शिरसाळे यांच्याविरूध्द तक्रार दाखल केली.

फरार आरोपी एलसीबीच्या जाळ्यात.

जळगाव : भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार संशयित आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने अमरावती येथे सापळा रचून जेरबंद केले. संशयिताला पुढील कारवाईसाठी भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. भुसावळ बाजार पेठ पोलिसात २०१३ मध्ये प्रवीण खेमचंद बारी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून प्रवीण हा फरार होता. तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत असताना प्रवीण अमरावती येथे असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक राजेशसिंह चदंल यांच्या पथक रवाना झाले होते. प्रवीणला पुढील कारवाईसाठी भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

४७ गुरांची पोलिसांकडून सुटका.

रावेर : मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूरहून रावेरकडे गुरांनी भरलेला ट्रक येत असल्याची माहिती रावेर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी शहराबाहेरील हॉटेल प्रेसिडेंट पार्कजवळ ट्रकला थांबवून खानापूर येथील गो-शाळेत ४७ गुरांची सुटका केली असून यात एक गोऱ्हा मृत आढळला.

रावेर पोलिसांनी शहराच्या बाहेरच ट्रकला (एमएच. ३० एबी. ४४५३) पकडले. पोलिसांना पाहून ट्रकचालक व क्लिनरने ट्रक सोडून धूम ठोकली. पोलिसांनी ट्रक तत्काळ खानापूर गावाजवळ असलेल्या गो-शाळेत ट्रक नेला. त्याठिकाणी ट्रकमधील सर्व गुरे उतरविण्यात आली. कोंबून भरलेल्या गुरांमध्ये चार गाई व ४४ गोऱ्हे आहेत. यातील एक गोऱ्हा मृतस्थितीत आढळून आला. ट्रकवर ट्रक मालकाचे नाव कैलासचंद्र मालवा (बाळापूर जि. अकोला) असे आहे. प्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक थोरात, पोलिस निरीक्षक कैलास काळे, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश फडतरे आदींनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *