facebook
Thursday , December 8 2016
Home / Featured / आठ पालिकांसाठी आज मतदान
27-november-new-1

आठ पालिकांसाठी आज मतदान

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – जिल्ह्यातील सात नगरपालिका व एका नगरपंचायतीचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी आज (रविवारी) जिल्ह्यातील ३५६ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदान शांततेत होण्यासाठी केंद्रांवर दोन हजार पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या नगरपालिकांच्या निवडणुकीतील ४३ नगराध्यक्ष आणि ६५५ उमेदवारांचे भवितव्य रविवारी (२७ नोव्हेंबर) मतपेटीत बंद होणार आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशी म्हणजे २८ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जाणार आहेत.

जिल्ह्यातील राहुरी, देवळाली प्रवरा, राहता, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, पाथर्डी या नगरपालिका व शिर्डी नगरपंचायतीसाठी मतदान होणार आहे. शिर्डी वगळता इतर सर्व नगरपालिकांमध्ये यंदा जनतेतून नगराध्यक्ष निवडले जाणार असल्याने चुरस निर्माण झाली आहे. या सर्व नगरपालिकांसाठी ३५६ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. निवडणूक शाखेने मतदानाची सर्व तयारी पूर्ण केली आहे.

मतदान यंत्रे केंद्रांवर पोहोच केली आहेत. तसेच प्रत्येक केंद्रावर अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतदानासाठी एक हजार ७८० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर मतदान शांततेत व्हावे, यासाठी दोन हजार पोलिस कर्मचारी तसेच सातशे होमगार्ड नियुक्त केले आहेत. मतदान केंद्रांवर या कर्मचाऱ्यांचा पहारा राहणार आहे. यंदा एका प्रभागातून दोन नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत.

Check Also

aawaz-news-image

‘पोलिसांची भीती मनातून काढून टाका’

आवाज न्यूज नेटवर्क – जळगाव – कायदा वा नियम हे समाजाच्या भल्यासाठीच असून, त्यांचे जो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *